शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

परिसर मुलाखतीतून वायसीसीईच्या ४०० विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

By admin | Updated: October 24, 2015 01:19 IST

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (वायसीसीई) अंतिम वर्षातील ४०० विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

मोठी उपलब्धी : विविध नामांकित कंपन्या रांगेतगडचिरोली : यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (वायसीसीई) अंतिम वर्षातील ४०० विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आजवरच्या निवड प्रक्रियेत यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता सप्टेंबर महिन्यापासून परिसर मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. २०१५-१६ सत्राकरिता नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वायसीसीई येथे ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत परिसर मुलाखतीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये केपजेमिनी, टीसीएस, टेक महिंद्रा, इनॉटिक्स, सायबेज, झेन्सॉर, परसिस्टन्ट, इन्फोसेप्ट, इन्फोस्ट्रेच या बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. विविध पात्रता फेरीचे निकष आणि निवड प्रक्रियेतील काठिण्यपातळी यशस्वीरित्या पूर्ण करीत पहिल्याच फेरीत ४०० विद्यार्थ्यांनी या कंपन्यांमध्ये निवड निश्चित झाली आहे. कॉलेजमध्ये अन्य नामांकित कंपन्यांची येथे निवड प्रक्रियेकरिता रीघ लागलेली आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागाकडून पाचव्या सत्रापासून विद्यार्थ्यांकडून परिसर मुलाखतीकरिता आवश्यक गुणवत्तेनुसार तयारी करून घेण्यात येते. शिवाय एडीसीसीमार्फत ८० तासांच्या तासिका घेऊन विशेष मार्गदर्शन केले जाते. एनवायएसएसचे अध्यक्ष दत्ता मेघे, सचिव सागर मेघे, कोषाध्यक्ष आ. समीर मेघे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांना चांगल्या भाविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.विद्यार्थ्यांनी निवडीचे श्रेय प्राचार्य डॉ. उदय वाघे, प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. जावेद शेख, मेघे ग्रुप आॅफ कॉलेजेसचे ट्रेनिंग विभागाचे संचालक डॉ. शंतनु खंडेश्वर, ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट अधिकारी निरज वखरे यांना दिले आहे. ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागातील प्रा. जावेद शेख, निरज वखरे, प्रा. मनीष हडप हे अधिकाधिक विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीच्या माध्यमातून संधी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. (वा. प्र.)