शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत निवडणुकीत नव्यांना संधी

By admin | Updated: November 4, 2015 01:54 IST

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली ग्राम पंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघाने जि. प. चे पशुसंवर्धन व कृषी सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात १३ ही जागांवर यश मिळविले. कमलापूर ग्राम पंचायतीवर आविसंने यश मिळविले आहे. मुलचेरा, सिरोंचा, धानोरा, चामोर्शी तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीवर नव्यांना मतदारांनी संधी दिली. मुलचेरा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नोटाचांही वापर मतदारांनी केला.अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली ग्राम पंचायतीवर माजी आ. दीपक आत्राम गटाने घवघवीत यश मिळवित १३ ही जागांवर विजय संपादन केला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या या ग्राम पंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी, नाविसं, काँग्रेस, राकाँ या सर्वांची युती असतानाही आविसंने हे घवघवीत यश मिळविले आहे. अहेरी तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालात माजी आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आविसंने घवघवीत यश मिळाविल्याची माहिती जि. प. सभापती अजय कंकडालवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.रेपनपल्ली ग्राम पंचायतमध्ये आविसंने अजय कंकडलावार यांच्या नेतृत्वात हे यश मिळवून राजकीय पक्षांना चारहीमुंड्या चित केले आहे. येथे आविसंच्या विजयी उमेदवारांमध्ये शंकर रामा भसारकर, सुरेखा दिवाकर आलाम, सिताराम गोसाई मडावी, मनुका येमाजी मुजमकर, विलास मोतीराम बोरकर, लक्ष्मण बकय्या कोडापे, जीवनकला लक्ष्मण कोडापे, बंडू कोंडया सडमेक, सुनीता समय्या बुरजाल, ईश्वरीताई बाजीराव सिडाम, मोडी नागय्या कोटरंगे, पंचफुला रामय्या कांबळे, निर्मला लक्ष्मण कोडापे यांचा समावेश आहे. तर बोरी ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकीत महेश सडमके हेही आविसंकडून विजयी झाले आहेत. चिचगुडी येथेही आविसचा उमेदवार विजयी झाला.कमलापुरातही आविसंला यशअहेरी तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायतमध्ये आदिवासी विद्यार्थी संघाच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळविला आहे. वॉर्ड क्र. १ मधून सांबय्या मोडी करपेत, महेश गोपी मडावी, सपना तलांडी, वॉर्ड क्र. २ मधून पार्वती आत्राम, शंकर आत्राम, मंगला दुर्गे, वॉर्ड क्र. ३ मधून सावित्री चोपावार, रूपा येजुलवार, रजीनिती कुमरे हे विजयी झाले आहेत. ९ पैकी ७ जागा आविसंने जिंकल्या. (लोकमत वृत्तसेवा)चामोर्शी तालुक्यातही ग्रा. पं. निवडणुकीत नव्यांना संधी४चामोर्शी तालुक्यात हळदवाही माल ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकीत संतोष रमेश मेकलवार, ग्रा. पं. पेटतथळा येथे ओमप्रकाश मनिराम बर्लावार, पुष्पा आनंदराव चौधरी, ग्रा. पं. मुरमुरी येथे अरविंद मोहन मोहुर्ले, सुनील सीताराम सेडमाके, मंजूषा विलास मोहुर्ले, ग्रा.पं. मक्केपल्ली माल येथे जिजाबाई रामचंद्र सोनटक्के, रेखा कैैलास भट्टलवार, ग्रा. पं. मक्केपल्ली चक नं. १ येथे दिवाकर चनका कांदो, गिरमा चनका मोहंदा, ग्रा. पं. आष्टी येथे बंडू हिरामन कुबडे, ग्रा. पं. माडेआमागाव माल येथे शारदा भारत तावाडे, ग्रा. पं. सुभाषग्राम येथे बासंती विकास मैत्र हे निवडून आले आहेत. तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार (निवडणूक) एस. के. चटगुलवार, एन. के. कुमरे, एस. व्ही. सरपे, एस. आर. कावळे, डी. एम. दहीकर, आर. एम. वैद्य यांनी काम पाहिले. मतमोजणीदरम्यान पोलीस निरीक्षक किरण अवचारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.धानोरा तालुक्यातही अनेकजण अविरोध विजयी४गोंडलवाही ग्राम पंचायतमध्ये ७ पैकी ५ जागा अविरोध निवडून आल्या आहे. यामध्ये रवींद्र देवलू बोगा, गोसाई महारू उसेंडी, बबीता रमेश उसेंडी, कविता मंगुराम उसेंडी, वसंत सतरू पोटावी हे निवडून आले आहेत. दोन जागांकरिता नामांकन अर्ज आले नाहीत. येरकड येथे पुष्पा दुरगु नरोटे, चिचोडा येथे दीपक मनोहर आतला, अल्का रामसाय आतला, तुकाराम लिंगु उसेंडी, दानशूर बैजू उसेंडी हे अविरोध निवडून आले आहे, अशी माहिती तहसीलदार धानोरा यांनी दिली आहे. काही भागात नामांकन अर्ज आले नाहीत.मुलचेरा तालुक्यातील निवडणूक निकाल जाहीर४वेंगनूर ग्रा. पं. च्या प्रभाग नं. १ मध्ये वसंता भिवा गोटा, प्रभाग नं. २ मध्ये नुनेश्वर रामदास नरोटे, गावडे सरिता देवाजी, प्रभाग नं. ३ मध्ये गावडे सोन्या सैनू, लता नामदेव नरोटे, विवेकानंदपूर ग्रा.पं. मध्ये उईके कविता नरेंद्र या २१० मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी बंगाली सविता अमित यांचा पराभव केला. सविता बंगाली यांना १८२ मतदे मिळाले. सात मतदारांनी नोटाचा वापर केला. येथे उईके कविता नरेंद्र विजयी झाल्या आहेत. विवेकानंदपूर प्रभाग क्र. ३ मध्ये अमोल आनंद करकाडे ४०९ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी नागोसे रमेश देवराव यांचा पराभव केला. त्यांना ३१४ मते मिळाली. १५ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. ३ मध्ये गृह कनक श्यामल हे विजयी झाले आहेत. त्यांना ३७९ मते मिळाली. त्यांनी पोद्दार मनोरंजन ब्रजलाल यांचा पराभव केला. त्यांना ३०१ मते मिळाली. येथे सरदार शशोधर मुकुल यांना ४८ मते मिळाली. १० जणांनी नोटाचा वापर केला. विवेकानंदपूर प्रभाग क्र. ३ मध्ये दास बिना दिलीप विजयी झालेत, त्यांना ३१७ मते मिळाली. राय कल्याणी गौरहरी यांना ३०४ यांना, चक्रवती रिना चयन यांना १०१ मते मिळाली, १६ मतदारांनी नोटाचा वापर केला. सिरोंचा तालुक्यात १२ उमेदवार अविरोध विजयी४सिरोंचा तालुक्यात एक सार्वत्रिक व ११ ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकीत १९ पैकी ५ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत विजयी झाले. तर १२ उमेदवार अविरोध निवडून आले. यात अनुसूचित जमातीच्या ९ महिला सदस्यांचा समावेश आहे. प्रभाग व वर्गवारीनिहाय विजयी उमेदवारांमध्ये सिरकोंडा येथे रमेश चेल्ला गावडे, भारती कापा गावडे, विज्जी गावडे, लक्ष्मण गावडे, भारती श्रीनिवास गोमाशी, निलाबाई मुक्ता गावडे, वंजा केसा तलांडी, आसरअल्ली येथे पोटनिवडणुकीत पोडेम पोसक्का लिंगय्या, लक्ष्मी देवीपेठा येथे गुंडम जंगमा बापू, चिंतरेवला येथे मेचनेनी मधुसुदन नर्सय्या, पोचमपल्ली येथे सिंगनेनी समय्या किष्टय्या, झिंगानूर येथे सत्यनारायण मारय्या गण्यारपवार, रमेशगुडम येथे मडावी सिंगा कारे, पातागुडम येथे आत्राम मधुसुदन वसंत, मद्दिकुंठा येथे इकमला सरिता मधुकर, बेल्लमकोंडा लसमय्या रामय्या, आरडा येथे आकुदारी राजेश समय्या, वडधम येथे चिंतला राजलक्ष्मी येरय्या आणि रामज्जापूर येथे सारक्का लच्म्मा जेका हे विजयी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)