शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाने रोजगाराच्या संधी

By admin | Updated: August 11, 2014 23:56 IST

गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

रमेश बोरकर - मालेवाडागडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र शासनाचे दुर्लक्ष व नक्षल्यांची दहशत यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही.पर्यटन स्थळ म्हणून विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडेश्वर देवालय, चपराळा येथील त्रिवेणी संगम, अभयारण्य, रेगडी येथील कन्नमवार जलाशय, आलापल्ली येथील ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, आलापल्ली येथे रानम्हशींसाठी राखीव असलेले अभयारण्य, कमलापूर येथील हत्तीकॅम्प, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले कालेश्वर मंदिर, लाकडाचे विश्रामगृह, बांडिया व पामूलगौतम नदीचा संगम, सोमनूरच्या त्रिवेणी संगम, इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी येथील गरम पाण्याचे झरे, लख्खामंडा येथील प्राचीण लाक्षागृह, नैसर्गिक खुले रंगमंच, लोक बिरादरी प्रकल्प, भामरागड अभयारण्य, माडिया आदिवासी संस्कृती, सुरजागड येथील लोहखनिज व सुरजागडचा किल्ला, आमगाव येथील प्राचीन मंदिर, डोंगरगाव, अरततोंडी येथील शिवमंदिरे, खोब्रामेंढा, टिपागड येथील भूईपोट किल्ले, वैरागड येथील प्राचीन मंदिर, गोरजाईचा डोह, किल्ल्याचे प्रवेशद्वार, धानोरा, डोंगरगाव सोनसरी पहाडावरील चिचपाणी झरा अशी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश पर्यटन स्थळे दुर्गम व घनदाट जंगलात आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देतांना बऱ्याच अडचणींचा सामना पर्यटकांना करावा लागतो. यातील काही स्थळांपर्यत अजूनही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे कित्येक किलोमीटर जागा पायी जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून या स्थळांची डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे ही स्थळे जीर्णावस्थेपर्यंत पोहोचली आहेत. अप्रतीम, ऐतिहासीक व स्थळे असले तरी याकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होण्यामागे नक्षल्यांची दहशत हे सुध्दा महत्वाचे कारण आहे. या स्थळांचा विकास झाला असता तर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळाली असती. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असता. पर्यटकांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चहा, अल्पोपहार उपलब्ध करून देणे, पर्यटकांची अडचण दूर करणे, त्यांना रस्ते, थांबे, पर्यटनस्थळांविषयीची माहिती देणे आदींच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. रोजगार पुरविण्यासाठी सध्या वनविभाग पुढाकार घेत आहे. पर्यटनस्थळांचा विकास केल्यास रोजगारात भर पडण्यास मदत होईल.