शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागांचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:04 IST

गडचिरोली शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे ओपन स्पेसचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत कामे : प्रत्येक खुल्या जागेसाठी १६ ते २५ लाख रूपयांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील २३ ओपन स्पेसच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे ओपन स्पेसचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी ओपन स्पेस सोडण्यात आले आहे. मात्र या ओपन स्पेसचा नगर परिषदेने विकास केला नाही. त्यामुळे काही ओपन स्पेसवर नागरिकांनी अतिक्रमण करून ती बळकाविली तर काही ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात असल्याने त्या ओपन स्पेसला डम्पिंग यॉर्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे. फुलांची झाडे दिसण्याऐवजी गवत व झुडूपे वाढली आहेत. दिवसभर ओपन स्पेसमध्ये डुकरांचा हैदोस राहत असल्याने सभोवतालचे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी होत होती.राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाणार आहेत. यामध्ये आरमोरी मार्गावरील नरेश हेमके यांच्या घराजवळील खुल्या जागेचा विकास करून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर कारमेल शाळेजवळील पठाण यांच्या घरामागील ओपन स्पेस, लांझेडा येथील श्री समर्थ यांच्या घराजवळील जागा, डॉ. कामळी हॉस्पिटल जवळील डांगे यांच्या घरासमोरील जागा, चामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार यांच्या ले-आऊटमधील जागा, शाहू नगरातील तामसेटवार यांच्या घराजवळील खुली जागा, गुहे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, विसापूर मार्गावरील भोयर यांच्या घराजवळील जागा, मिल्ट्री कॅम्पलगत उईके यांच्या घराजवळची जागा, आयटीआय चौकातील नगर परिषद संकुलजवळच्या दोन खुल्या जागा, झाशी राणी नगरातील वर्षा बट्टे यांच्या घरासमोरची खुली जागा, चामोर्शी मार्गावरील जंगल कामगार सोसायटीजवळची खुली जागा, हेडगेवार चौैकातील महादेव मेश्राम, शिवाजी महाविद्यालयामागील खुली जागा, फाले व वाळके यांच्या घरामागील खुली जागा, होंडा शो रूमजवळील सोरते व बन्सोड यांच्या जवळची खुली जागा, खांडरे व मुरस्कर यांच्या घराजवळील खुली जागा, कन्नमवार नगरातील मेश्राम यांच्या घराजवळील खुली जागा, मुख्याधिकारी निवासस्थानाजवळची जागा, चामोर्शी मार्गावरील पाराशर, म्हशाखेत्री यांच्या घराजवळील जागा, रामदास कायरकर यांच्या घराजवळची जागा, शिक्षक कॉलनीमधील काथवटे यांच्या घराजवळची जागा, पंचवटी नगरातील धाईत यांच्या घराजवळील खुल्या जागेचा विकास केला जाणार आहे.प्रत्येक खुल्या जागेच्या विकासासाठी जवळपास २५ लाख ते १५ लाख रूपयापर्यंतचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.