शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत २० हजार नागरिकांचे खाते उघडा

By admin | Updated: November 19, 2016 01:53 IST

एटापल्ली उपविभागात एकूण कुटुंबांची संख्या ४१ हजार ४३ एवढी आहे. मात्र केवळ १४ हजार २७३ कुटुंबाकडे बँक खाते आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : भामरागड, एटापल्ली तालुक्यात केवळ ३५ टक्के नागरिक बँकसेवेशी जुळलेगडचिरोली : एटापल्ली उपविभागात एकूण कुटुंबांची संख्या ४१ हजार ४३ एवढी आहे. मात्र केवळ १४ हजार २७३ कुटुंबाकडे बँक खाते आहेत. उर्वरित कुटुंबांचे बँक खाते काढण्यासाठी मोहीम उघडली जाणार आहे. यासाठी गावातील कोतवाल व रोजगार सेवकांची मदत घेण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला. येणाऱ्या महिनाभरात एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यांमधील नागरिकांचे खाते उघडण्यासाठी बँकांचे कर्मचारीही सहकार्य करतील. दोन महिन्यात बँकांनी २० हजार नागरिकांचे खाते उघडावे, असे निर्देश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शुक्रवारी दिले. शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात गटस्तर समितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्प अधिकारी बाबरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक अरूणकुमार, लिड बँकेचे व्यवस्थापक एस. आर. खांडेकर, बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक शांतीलाल सेता, नाबार्डचे व्यवस्थापक कोल्हे आदींसह स्थानिक बँकांचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीदरम्यान बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक म्हणाले की, गावपाड्यांवर नागरिकांना आर्थिक व्यवहार बँकेच्या मार्फतीने करता यावे, यासाठी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. देशभरात एकूण अडीच लाख सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यातील एक सेवा केंद्र एटापल्लीत सुरू आहे. या सेवा केंद्राची उलाढाल दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशा केंद्रांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिल्यास बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. बँकेचे नाव व आधार क्रमांक यांच्या मदतीनेही आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले आहे. या केंद्रांना खाते उघडणे, वित्त सहाय्य करणे आदींचेही अधिकार दिले आहेत. एटापल्ली बचत गटांनीही याच सेवा केंद्राच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करावे, यासाठी बँकांनी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)