शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१ ते ७ वर्गाला केवळ दोनच शिक्षक

By admin | Updated: December 2, 2014 23:06 IST

चामोर्शी पंचायत समितींतर्गत कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या ७ वर्गांसाठी आता दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळेत शिक्षणाचा पुरता

आष्टी : चामोर्शी पंचायत समितींतर्गत कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या ७ वर्गांसाठी आता दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळेत शिक्षणाचा पुरता बट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे, या शाळेत कार्यरत असलेल्या दोन मद्यपी शिक्षकांवर धिंगाणा घातल्याप्रकरणी पं.स. शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. कढोली शाळेचे शिक्षक दुर्गे व कढोली शाळेचे शिक्षक दुर्गे व बोलमल्ली यांनी दारू पिऊन शाळेत धिंगाणा घातला होता. गावातील नागरिकांच्या तक्रारीवरून या दोन्ही शिक्षकांवर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वेतनवाढ थांबविण्याची कारवाई केली. तसेख् या दोन्ही शिक्षकांची याच पंचायत समितींतर्गत अन्य शाळांमध्ये बदली केली. त्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रामपूर येथील जि.प. शाळेचे शिक्षक भुसे यांची तात्पुरती कढोली शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रामपूर शाळेत कार्यरत असलेले एक शिक्षक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे तात्पुरती नियुक्ती केलेले शिक्षक घुसे यांना पुन्हा रामपुर शाळेत परत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे कढोली शाळेत १ ते ७ वर्गांसाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. १ ते ७ वर्गांमध्ये ७६ विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेत नव्या शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे.