शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्नियोजनासाठी मिळाला केवळ दोन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:19 IST

जिल्हा परिषदेच्या पुनर्नियोजित अर्थसंकल्पासाठी अपुरा निधी उपलब्ध असल्यामुळे सर्वच विभागांसाठी निधीची तरतूद करताना अर्थ व नियोजन समितीला काटकसर करावी लागली. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत या नियोजनाला सभागृहाने मंजुरी दिली.

ठळक मुद्देसभागृहाची मंजुरी : अपुऱ्या जिल्हा निधीमुळे नियोजनात काटकसर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या पुनर्नियोजित अर्थसंकल्पासाठी अपुरा निधी उपलब्ध असल्यामुळे सर्वच विभागांसाठी निधीची तरतूद करताना अर्थ व नियोजन समितीला काटकसर करावी लागली. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत या नियोजनाला सभागृहाने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस सदस्यांनी काही मुद्द्यांवर असमाधान व्यक्त करीत सभात्याग केला.पुनर्नियोजनासाठी सुमारे २ कोटीचा निधी उपलब्ध झाला. दुपारी १२ ते १ यादरम्यान झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत त्या निधीचे जिल्हा परिषदेच्या १७ विभागांसाठी नियोजन करण्यात आले. जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे यांनी या बजेटच्या तरतुदीला विरोध दर्शविला. मात्र उर्वरित सदस्यांनी बजेट मंजूर केला. त्यानंतर लगेच झालेल्या सर्वसाधारण सभेत कृषी विभागासाठी योग्य तरतुद केली नसल्याचे सांगत काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मर्यादित निधी असतानाही २५ लाखांची तरतूद केली असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.आरेवाडातील बांधकामाच्या चौकशीची मागणीही उपस्थित झाली. परंतू दहन-दफनभूमीचा निधी पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार थेट ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित होत असल्याने त्यात जिल्हा परिषदेचा संबंध नसल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, कृषी सभापती नाना नाकाडे, महिला व बालकल्याण सभापती जनसुधा जनगाम आदींसह सर्व विभाग प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते.काँग्रेस सदस्यांचा सभात्यागकाँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या जि.प.क्षेत्रातील कामे आधी मंजूर करून नंतर बदलविले जातात, असाही आरोप करीत आणि कृषी समितीकडून शेतकरीपूरक योजनांसाठी योग्य तरतूद होत नसल्याचे सांगत काँग्रेस व सहयोगी सदस्यांनी जि.प.सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांच्या नेतृत्वात सर्वसाधारण सभेतून बहिर्गमन केले.