शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

जिल्हा महिला रुग्णालयात वर्षभरात केवळ तीन मातामृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:37 IST

गडचिराेली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर व गाेंदिया जिल्ह्यातून गर्भवती माता प्रसूतीसाठी रेफर ...

गडचिराेली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर व गाेंदिया जिल्ह्यातून गर्भवती माता प्रसूतीसाठी रेफर केले जातात. परिणामी १०० खाटा असलेल्या या महिला रुग्णालयात वर्षभर रुग्णांची गर्दी असते. सन २०२० या वर्षात महिला रुग्णालयात एकूण ५ हजार ४४८ गर्भवती मातांची प्रसूती करण्यात आली. वर्षभरात केवळ तीन मातांचा येथे मृत्यू झाला.

महिलांची जीवनशैली बदलली असल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून सीझर प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभरात २ हजार ६५७ नार्मल प्रसूती झाल्या तर २ हजार ७९१ गर्भवती महिलांची सीझर प्रसूती करावी लागली.

महिला व बाल रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डाॅ. दीपचंद साेयाम कार्यरत आहेत. त्यांच्या साेबतीला प्रसूतितज्ज्ञ, बालराेगतज्ज्ञ इतर वैद्यकीय अधिकारी तसेच आराेग्य कर्मचाऱ्यांची चमू आहे. मात्र या रूग्णालयात मंजूर पदांपैकी बरीच पदे रिक्त असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे.

बाॅक्स.........

कुठल्या महिन्यात किती

महिना एकूण प्रसूती सीझर नाॅर्मल मृत्यू

जानेवारी ४९६ २७० २२६ ०

फेब्रुवारी ४३५ २११ २२४ ०

मार्च ४८४ २४१ २४३ ०

एप्रिल ४०३ २२२ १८१ ०

मे ३९९ २२२ १७७ ०

जून ३५५ १८८ १६७ ०

जुलै ३२४ १७८ १४६ ०

ऑगस्ट ४७५ २४७ २२८ १

सप्टेंबर ४८८ २५० २३८ ०

ऑक्टाेबर ५४२ २४४ २९८ ०

नाेव्हेंबर ५२० २५६ २६४ १

डिसेंबर ५२७ २६२ २६५ १

एकूण ५,४४४ २,७९१ २,६५७ ३

काेट .....

गर्भवती महिलांनी तीन महिन्यांपासून तर नऊ महिन्यांपर्यंत तीन ते चार वेळा साेनाेग्राफी करावी. साेनाेग्राफीतून बाळाच्या हृदयाचे ठाेके कळतात शिवाय गर्भात पाण्याचे प्रमाण किती आहे हे समजते. साेनाेग्राफीतून निदान हाेत असल्याने सुरक्षितरीत्या प्रसूती पार पडते. सुरुवातीपासून याेग्य औषधाेपचार व काळजी घेतल्यास माता व बालकाला धाेका पाेहाेचत नाही. जिल्हा महिला रूग्णालयात पूर्ण काळजी घेतली जात असल्याने मातामृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. - डाॅ. दीपचंद साेयाम, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिराेली.

बाॅक्स ...........

रूग्ण रेफरचा भार वाढला

गडचिराेलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बाहेर जिल्ह्यातून रेफर हाेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अतिजाेखमीच्या माता या रुग्णालयात वेळेवर रेफर केले जातात. अशावेळी प्रसूतीदरम्यान माता व बालकांना सुरक्षितरीत्त्या वाचविण्याचे माेठे आव्हान येथील आराेग्य यंत्रणेवर असते. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात सिजर प्रसुतीसाठी पुरेसे प्रयत्न केले जात नसल्याने अनेक गर्भवती महिला रुग्णालयात वेळेवर भरती हाेतात. परिणामी रूग्ण रेफरचा भार येथील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस वाढत आहे.