शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या जाेरावरच युवक मिळवू शकतात विविध क्षेत्रात माेठे पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत उपविभाग कुरखेडा व पोलीस स्टेशन कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने नवेझरी येथे ११ सप्टेंबर राेजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. नवेझरी येथील सरपंच विजय हिडामी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : आपण लहान गावातील रहिवासी असलाे तरी शिक्षणामुळे आपण मोठे पद मिळवू शकतो, हा अधिकार आपणाला भारतीय संविधानातून मिळालेला आहे. त्यामुळे गावातील युवक भरपूर शिक्षण घेऊन आयपीएससारखे पद मिळवू शकतात, असे प्रतिपादन गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले.गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत उपविभाग कुरखेडा व पोलीस स्टेशन कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने नवेझरी येथे ११ सप्टेंबर राेजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. नवेझरी येथील सरपंच विजय हिडामी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, नागपूर विशेष कृती दलाचे पोलीस अधीक्षक निल अब्राहीम, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, कुरखेडा पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, कोरचीचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले, तहसीलदार सी. आर. भंडारी, नवेझरीचे ग्रामसेवक योगाजी बन्सोड, माजी पोलीस पाटील तुळशीराम हिडामी, प्रतापसिंह गजभिये, निळा किलनाके आदी  उपस्थित होते. गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत आदिवासी रेला नृत्य सादर करून वाजतगाजत, नाचत केले. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. या मेळाव्यात हजारोंच्या वर नागरिक उपस्थित होते. कोरची तालुक्यात पोलीस विभागाकडून  आतापर्यंतच्या झालेल्या जनजागरण मेळाव्यापैकी हा पहिला मेळावा असेल की अतिदुर्गम, नक्षलग्रस्त नवेझरीसारख्या गावात वरिष्ठ पोलीस अधिकारी  हेलिकॉप्टरने येऊन मेळाव्याला उपस्थित झाले हाेते. यशस्वीतेसाठी गावातील व परिसरातील नागरिक व पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

४९ गावांतील हजारो लाभार्थींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटपसदर मेळाव्यात गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते ४९ गावांतील हजारो लाभार्थींना झेरॉक्स मशीन, एलईडी टीव्ही, भांडे, सायकल, शिलाई मशीन, अशा विविध जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यामध्ये रांगोळी, हॉलीबॉल, कबड्डी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच  मोफत औषधोपचार व आरोग्य शिबिराचे स्टॉलही लावण्यात आले होते. यावेळी सरपंच, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी व असंख्य नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Policeपोलिस