शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ५० टक्के धानाची भरडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:03 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देअडीच लाख क्विंटल धान केंद्रांवरच पडूनदीड लाख क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाकडे जमा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी २ लाख ४३ हजार ७७८ क्विंटल इतक्या धानाची भरडाई झाली असून या भरडाईची टक्केवारी ५० टक्क्यावर पोहोचली आहे. भरडाईसाठी केंद्रांवरून धानाची उचल करण्यास दिरंगाई होत असल्याने अद्यापही तब्बल २ लाख ५९ हजार ९०४ क्विंटल धान केंद्रावर पडून आहे.५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानापैकी २ लाख ४६ हजार ७७८ क्विंटल धान भरडाईसाठी महामंडळाच्या वतीने मिलर्सना देण्यात आले. आतापर्यंत २ लाख ४६ हजार ७७८ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. धानाची भरडाई झाल्यानंतर ६७ टक्क्याप्रमाणे तांदूळ येत असतो. त्यानुसार भरडाई झालेल्या एकूण धानामधून १ लाख ६२ हजार ३४१ क्विंटल इतका कच्चा तांदूळ निघाला. यापैकी १ लाख ५१ हजार ६२८ क्विंटल कच्चा तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे जमा आहे, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मिलर्सकडे अद्यापही १३ हजार ७१३ क्विंटल तांदूळ शिल्लक आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ३ लाख ६३ हजार ६५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर अहेरी कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवरून १ लाख ३८ हजार २६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व महामंडळाकडे पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. सध्या उन्हाळा सुरू असूनही वातावरणात बदल घडून अवकाळी पाऊस बरसत आहे. काही दिवसांपूर्वी अहेरी उपविभागात तसेच जिल्ह्याच्या इतर विभागात वादळी पाऊस बरसला. अशाच प्रकारचा पाऊस येत्या काही दिवसात झाल्यास केंद्रांवर असलेल्या धानाची नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खरीप हंगामात आविका संस्थांच्या केंद्रांवर धान विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार बोनस देण्याची तरतूद आहे. ५ ते ४९ क्विंटल धान खरेदी धान विक्री केलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल २०० रूपये बोनस आदिवासी विकास महामंडळाकडून दिला जातो.रबी हंगामाच्या उन्हाळी धानासाठी १४ केंद्रेकुरखेडा, कोरची, आरमोरी या तीन तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक शेतकरी घेतात. आता उन्हाळी धान पिकाची मळणी सुरू असल्याने महामंडळाने या तीन तालुक्यात १४ धान खरेदी केंद्रे सुरू केले आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील आंधळी, कढोली, कुरखेडा, घाटी, सोनसरी, गेवर्धा, वडेगाव, देऊळगाव, गोठणगाव, कोरची तालुक्यातील बेतकाठी, रामगड, गॅरापत्ती, येंगलखेडा व आरमोरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी केंद्राचा समावेश आहे.