शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील केवळ २७ रेती घाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:24 IST

मागील वर्षी जिल्हाभरातील ६६ रेती घाटांचे लिलाव करण्यात आले होते. मात्र राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडून यावर्षी परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने त्याचा परिणाम रेती घाटांच्या लिलावावर झाला आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील केवळ २७ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे.

ठळक मुद्देचार पट दर : राज्यस्तरीय समितीमुळे प्रक्रिया खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षी जिल्हाभरातील ६६ रेती घाटांचे लिलाव करण्यात आले होते. मात्र राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडून यावर्षी परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने त्याचा परिणाम रेती घाटांच्या लिलावावर झाला आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील केवळ २७ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे.मागील वर्षीपर्यंत रेती घाटांना परवानगी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांकडे होते. मात्र यावर्षीपासून हे अधिकार राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया आॅक्टोबर किंवा नोव्हेंपर्यंत आटोपून लगेच रेती उपसा सुरू होणे आवश्यक राहते. मात्र यावर्षी राज्यस्तरीय समितीकडून रेती घाटांना परवानगी मिळण्यास विलंब झाला. मार्च महिन्यात सदर समितीने परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात ३३ रेती घाट लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २७ घाटांचा लिलाव झाला आहे. उर्वरित सहा रेती घाटांसाठी कंत्राटदारांनी लिलावात भागच घेतला नाही.रेतीअभावी शहरातील अनेक नागरिकांनी बांधकामांना सुरूवात केली नाही. रेती मिळताच बांधकाम सुरू होतील. त्यामुळे रेती चढ्या भावाने विकता येईल. हा अंदाज बांधून पहिल्या टप्प्यातील लिलावातील घाट कंत्राटदारांनी चढती बोली लावून खरेदी केले आहेत.काही रेती घाटांना चार पट दर मिळाला आहे. मागील वर्षी ६६ रेती घाटांचा लिलाव झाला होता. त्यातून २४ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी पहिल्या टप्प्यात केवळ २७ रेती घाटांचा लिलाव झाला आहे. त्यातून २२ कोटी ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रेती घाटांची अधिक दराने लिलाव झाल्याने नागरिकांनाही अधिक दरानेच विक्री सुरू आहे.सिरोंचातील सहा घाटांना कंत्राटदारच मिळेनासिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीतील मुक्तापूर माल, मुकडीगुडा, वडधम माल, नगरम घाट- १, नगरम घाट- २ व चिंतलवेला या रेती घाटांच्या विक्रीसाठी पहिल्या टप्प्यातच लिलाव आयोजित केला होता. यासाठी तीन वेळा लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र तिसऱ्याही वेळी शासनाने ठरविलेल्या दराने घाट खरेदी करण्यासाठी एकाही कंत्राटदाराने लिलावात सहभाग घेतला नाही. गोदावरी नदीवरील हे घाट सर्वात मोठे आहेत. या रेती घाटांची जवळपास ३५ हजार ते ५३ हजार ब्रॉस रेती उपसा क्षमता आहे. या घाटांमधून शासनाला जवळपास २० कोटी रुपयांचा महसूल मिळाला असता, मात्र कंत्राटदारांनी लिलावात सहभागच घेतला नाही. दीड महिन्यानंतर पावसाला सुरूवात होणार आहे. एवढ्या कमी कालावधीत निश्चित केलेल्या रेतीचा उपसा करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी सदर रेती घाट घेण्यास उत्सुकता दाखविली नाही.३८ रेती घाटांना परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरूचदुसऱ्या टप्प्यात ३८ रेती घाटांना परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजूनपर्यंत या रेती घाटांना समितीची परवानगी मिळाली नाही. समितीची परवानगी मिळून रेती घाट सुरू होईपर्यंत पावसाळा लागणार आहे. पावसाळ्यात रेतीचा उपसा करणे शक्य नाही. कोणत्याही परिस्थितीत रेती घाटातून ३० सप्टेंबरपर्यंत रेतीचा उपसा करावा लागतो. अन्यथा कंत्राटदाराला तोटा होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता परवानगीसाठी प्रस्तावित असलेल्या ३८ रेती घाटांचीही विक्री धोक्यात आहे.