शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १७.१४% पाणीकर वसुली

By admin | Updated: January 4, 2016 03:55 IST

जिल्ह्यातील बाराही पंचायत समिती अंतर्गत एकूण ४५६ ग्रामपंचायतींची १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ

आठ महिन्यांत : ग्रामपंचायतींची उदासीनता चव्हाट्यावरगडचिरोली : जिल्ह्यातील बाराही पंचायत समिती अंतर्गत एकूण ४५६ ग्रामपंचायतींची १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत केवळ १७.१४ टक्के पाणी कर वसुली झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी कर वसुलीत साऱ्याच ग्रामपंचायती प्रचंड माघारल्याचे दिसून येत आहे. १२ ही पंचायत समितीतील एकूण ४५६ ग्रामपंचायतीची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून ३ कोटी ४९ लाख ३७ हजार ९४१ रूपये पाणीपट्टी कराची मागणी होती. यापैकी जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून ३० नोव्हेंबरपर्यंत केवळ ५९ लाख ८८ हजार ९०२ रूपये पाणी कर वसुली झाली असून याची टक्केवारी १७.१४ आहे. गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतीची मागील थकबाकीची ९ लाख २४ हजार ३८५ रूपये पाणी कराची मागणी होती. मात्र यापैकी ग्रामपंचायतीने एकाही रूपयाची पाणी कर वसुली नागरिकांकडून केली नाही. त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायती पाणी कर वसुलीत प्रचंड पिछाडीवर असल्याचे दिसून येते. आरमोरी तालुक्यात जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून ४३ लाख २५ हजार १०७ रूपयांची मागणी होती. ग्रामपंचायतींनी जुनी व चालू वर्षाची मिळून एकूण ९ लाख ९४ हजार ९७५ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी २३ आहे. देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ३४ लाख ९५ हजार ९२९ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी एकूण ४७ लाख ८ हजार ७०४ रूपयांची वसुली झाली असून याची टक्केवारी १३.६९ आहे. कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ३४ लाख १० हजार ७२९ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी ३० नोव्हेंबरपर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५ लाख १२ हजार ६१९ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी १५.०३ आहे. कोरची तालुक्यातील ग्रामपंचायतीची मागील थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ७ लाख २८ हजार ६३६ रूपयांची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी एकूण १ लाख २७ हजार २७० रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी १७.४७ आहे. धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १९ लाख ७८ हजार ४६९ रूपयांची कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी एकूण ४ लाख १५ हजार ९९२ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी २१.३ आहे. चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीची एकूण ८२ लाख ३७ हजार ६८ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी १२ लाख ३५ हजार ५६० रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी १५ आहे. मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायती एकूण १५ लाख ८७ हजार रूपये कराची मागणी होती. यापैकी ५ लाख ४४ हजार ७०० रूपये कर वसुली झाली असून याची टक्केवारी ३४.३२ आहे. एटापल्ली तालुक्यातील १३ लाख ६८ हजार ९४५ रूपयांच्या मागणीपैकी ४ लाख २४ हजार ३७२ रूपयांची कर वसुली झाली असून याची टक्केवारी ३१ आहे. सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आठ महिन्यांत एकूण ९ लाख ४८ हजार ८९६ रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी १८.८५ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चालू वर्षाची गृहकर वसुली ठप्प४राज्याच्या ग्राम विकास विभागाने २०१५-१६ वर्षापासून ग्रामपंचायतीच्या कर आकारणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भाचे २१ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा .परिषदेला पत्रही प्राप्त झाले. मात्र ग्राम विकास विभागाकडून ग्रामपंचायतीच्या गृहकराचे नवीन दर निश्चित करण्यात आले नसल्याने ग्रामपंचायतीची चालू वर्षाची गृहकर वसुली ठप्प आहे. काही ग्रामपंचायती जुनी थकीत गृहकराची वसुली करीत असल्याचे दिसून येते.बहूतांश ग्रामपंचायतींनी पाणी करवसुलीला खो दिला आहे.अहेरी, भामरागड तालुके कर वसुलीत पिछाडीवर४अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकूण २९ लाख ६६ हजार ९६२ रूपये मागणीपैकी केवळ २ लाख १६ हजार ९९४ रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी ७.३१ आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पाणी कर वसुलीत अहेरी तालुका सर्वात पिछाडीवर असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल भामरागड तालुक्यातील ग्रा.पं.नी केवळ ८८ हजार ८२० रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी १०.०८ आहे. भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायती पाणी कर वसुलीत माघारल्या आहेत.