शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १५ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:39 IST

पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे२०२ कोटींचे उद्दिष्ट : ८ हजार २७९ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो.या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयीयीकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाऱ्यांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मे अखेरपर्यंत केवळ ८ हजार २७९ शेतकऱ्यांना ३० कोटी ८९ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक झाले आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.जून महिन्यात कर्ज वाटपाला मिळेल गतीगडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या रोवणीला सर्वाधिक खर्च येतो. धानाच्या रोवणीची कामे जुलै महिन्याच्या सुरूवातीला सुरूवात होतात. कर्ज घेतलेले पैसे खर्च होण्याची शक्यता असल्याने शेतकरी जुन किंवा जुलै महिन्यातच कर्ज घेणे पसंत करीत असल्याने येत्या आठ दिवसांत कर्ज वाटपाला गती येईल अशी शक्तता व्यक्त केली जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवरकर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ मे पर्यंत ७ हजार ९३ शेतकऱ्यांना २४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने १ कोटी ६३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १ कोटी ३५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ४ लाख, आयडीबीआय बँक २४ लाख, एसबीआय १ कोटी ४३ लाख, युनियन बँक २३ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक २ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दरवर्षी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असले तरी या उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्ज वाटप या बँकांकडून केले जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

टॅग्स :bankबँक