शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत आॅनलाईन नोंदणीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:42 IST

सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाºयांना दिली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.नियोजन भवनातील नवीन सभागृहात मतदार दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करणे आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू, अशा आशयाची शपथ यावेळी कर्मचाºयांना देण्यात आली.लोकशाहीच्या उभारणीत मतदारांनी आपले योगदान द्यावे, आपल्या शेजारी असलेल्या नागरिक व युवकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. मतदारांमध्ये जनगृती व्हावी आणि मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदार दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा नववा मतदार दिन जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला.संचालन नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी केले.दौड स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृतीदौड स्पर्धेत गडचिरोली येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून सेमाना आणि परत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दौडमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या युवक युवतींना रोख, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये रितीक संजय पंचबुध्दे, ओमसाईराम मधुकर कुमरे, हेमंत संजय आथिलकर, कुमारी प्रतिक्षा रमेश करंगाम, सुशिला जंतुराम चनाप, दुर्गेश्वरी किसन किरसान यांचा समावेश होता. दौडमध्ये अधिकारी व कर्मचाºयांनीही सहभाग घेतला. यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, सीईओ डॉ. विजय राठोड, मनिष कुमार, भुवनेश पाटील, रोहन गुगे यांचा समावेश आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी