शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाची होणार आॅनलाईन खरेदी विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:24 IST

शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली.

ठळक मुद्देशेतकºयांना मिळणार लाभ : ई-नाम योजनेत गडचिरोली जिल्ह्यात केवळ अहेरी बाजार समितीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्टÑातील ३० कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. अहेरी उपविभागातील शेतकºयांना आता आपल्या शेतमालाची खरेदी विक्री आॅनलाईन पद्धतीने करता येणार असून ई-लिलावाचा लाभ शेतकºयांना होणार आहे.बाहेरील बाजार सुरू असलेल्या शेतमालाच्या भावाची माहिती स्थानिकस्तरावर मिळावी, तसेच शेतकºयांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा, खरेदी-विक्रीत पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र शासनाने ई-नाम योजना सुरू केली आहे. आॅनलाईन खरेदी-विक्रीची सदर योजना सुरुवातीला काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा प्रकारची आॅनलाईन खरेदी-विक्री प्रक्रिया संपूर्ण महाराष्टÑात व सर्व ठिकाणी सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सदर आॅनलाईन प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या प्रक्रियेद्वारे सोयाबीन, धान, तूर, मूग, उडीद, बरबटी, कापूस, ज्वारी, मक्का आदीसह इतर शेतमालाची आॅनलाईन खरेदी करता येणार आहे. शनिवारी अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात याबाबत बैठक पार पडली. यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी यांना आॅनलाईन पद्धतीने शेतमालाची विक्री व बाहेरील बाजारात शेतमालाची बोली कशा पद्धतीने लावावी तसेच खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करावे, यासह इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती नेमलेल्या कंपनीमार्फत देण्यात आली.ई-नाम योजनेअंतर्गत अहेरी उपविभागातील शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री योग्यदराने करू शकतील, अशी शक्यता आहे.ई-नाम योजनेचा शुभारंभअहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ई-नाम योजनेअंतर्गत आॅनलाईन खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक प्रशांत पत्तीवार, मुथन्ना पेंदाम, विनोद अक्कनपल्लीवार, व्यापारी श्रीकांत मद्दीवार, सुधाकर बिरेल्लीवार, बाजार समितीचे कर्मचारी रमेश सापेलवार, महेश गुप्ता, हेमंत देशमुख, लक्ष्मणरेड्डी चिर्लावार, महेश गद्देवार, जीवनदास तावाउे, सुरेश करमे आदी उपस्थित होते.