लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : राहत्या घरातून अवैधरित्या विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मुक्तिपथ चमूला मिळाली. त्यानुसार मंगळवारी मुक्तिपथ चमूने पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या सहकार्याने नगरम येथे धाड टाकून १ लाख ६ हजार ६६६ रुपयांची विदेशी दारू जप्त केली.सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोहफूल तसेच गुळाची दारू विक्री करण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. मुक्तिपथ चमूच्या वतीने ठिकठिकाणी धाड टाकून दारूसाठा जप्त करून जागीच नष्ट केला जात आहे. यासंदर्भात अनेक गावातून चमूला तक्रारी येत आहेत. नगरम येथे राहत्या घरातून विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुक्तिपथ चमू नगरम येथे दाखल झाली. परंतु संबंधित व्यक्तीने घराची झडती घेण्यासाठी सर्च वॉरंटची मागणी केली. त्यानुसार मुक्तिपथ चमूने पोलीस व महसूल प्रशासनाची मदत घेतली. त्यानंतर आरोपी श्रीधर कंबगोणी याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून विदेशी दारूच्या निपा मोठ्याप्रमाणात आढळून आल्या. १ लाख ६ हजार ६६६ रुपयांचा मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. संपूर्ण माल जप्त करून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.सदर कारवाई नायब तहसीलदार एच.एच. सय्यद, पोलीस निरीक्षक अजय अहिरकर, मुक्तिपथचे संतोष चंदावार यांच्यासह पोलीस कर्मचारी व मुक्तिपथच्या कार्यकर्त्यांनी केली. मागील काही दिवसांपासून तालुक्यात राहत्या घरातून दारूविक्रीचे प्रमाण वाढले असल्याने शोधमोहीम राबविताना अडचणी येत आहेत.कियर व कारमपल्लीत साहित्य जप्तमुक्तिपथ गाव संघटना व तालुका चमूच्या पुढाकाराने भामरागड तालुक्यातील कियर व कारमपल्ली येथे दोन दुकानदारांची झडती घेण्यात आली. या तपासणीत तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा, सुगंधित तंबाखू सापडले. चमूने सर्व साहित्य गोळा करून जप्त केले. त्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ नष्ट केले. विशेष म्हणजे गावात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी चमूला दिली. त्यानुसार मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या मदतीने कारवाई केली. तसेच यापुढे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री दुकानातून न करण्याची तंबी दिली. दोन्ही दुकानदारांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.सूर्यापल्लीत गुळाचा सडवा केला नष्टसिरोंचा तालुक्याच्या सूर्यापल्ली येथे गुळापासून दारू गाळून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मुक्तिपथ चमूला मिळाली. चमूने सोमवारी चार ठिकाणी धाड टाकून चौकशी केली असता, एकाच्या घरी चार ड्रम मोहा व गुळाचा सडवा आढळून आला. सर्व माल जप्त करून कारवाईसाठी पोलिसांना माहिती दिली. यासाठी पीएसआय शीतल धवीले यांचे सहकार्य लाभले.
एक लाखाची विदेशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST
सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोहफूल तसेच गुळाची दारू विक्री करण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. मुक्तिपथ चमूच्या वतीने ठिकठिकाणी धाड टाकून दारूसाठा जप्त करून जागीच नष्ट केला जात आहे. यासंदर्भात अनेक गावातून चमूला तक्रारी येत आहेत. नगरम येथे राहत्या घरातून विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुक्तिपथ चमू नगरम येथे दाखल झाली.
एक लाखाची विदेशी दारू जप्त
ठळक मुद्देनगरम येथे धाड : मुक्तिपथ संघटना, पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई