लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आरमोरी तालुक्यातील कोसा विकासजवळ रवी जंगल परिसरात जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी एक जण वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. मात्र त्याच्या साथीदाराने प्रसंगावधान राखत झाडावर चढून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असताना सकाळी आरमोरी-वडसा मार्गावरील कोसा विकास या गावाजवळ रवी मार्गालगतच्या जंगल परिसरात भाजी म्हणून वापरल्या जाणाºया कुड्याचे फूल तोडण्यासाठी दोन इसम गेले होते. त्या दोघांवर झुडपात लपून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्यापैकी ज्ञानेश्वर निळकंठ कांबळे (35) हा ठार झाला तर आनंद पांडुरंग सोनकुसरे याने झाडावर चढून आपला जीव वाचविला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या भागातील जंगलात कोणीही जाऊ नये अशी सूचना त्यांनी केली आहे
गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:16 IST
आरमोरी तालुक्यातील कोसा विकासजवळ रवी जंगल परिसरात जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी एक जण वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. मात्र त्याच्या साथीदाराने प्रसंगावधान राखत झाडावर चढून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार
ठळक मुद्देदुसऱ्याने झाडावर चढून वाचवला जीव