लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील जपतलाईपासून १ किमी अंतरावर घडली. तर दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वाराने सायकलस्वारास धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजता गोडलवाही जि. प. शाळेसमोर घडली.सोमेश्वर पुडो (२१), मनोहर उसेंडी (२०) दोघेही रा. जपतलाई, रूपम मडावी रा. येडसकुही असे जखमींची नावे आहेत. तर दल्लू उसेंडी (२०) असे मृतकाचे नाव आहे. सोमेश्वर पुडो, मनोहर उसेंडी हे दोघेजण दुचाकीने धानोराकडे जात होते. तर रूपम मडावी हा दुचाकीने धानोरावरून जपतलाईकडे जात होता. दरम्यान जपतलाईजवळ दोन्ही दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीवरील तीघेजण गंभीर जखमी झाले. रूपम मडावी, सोमेश्वर पुडो यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तर मनोहर उसेंडी याच्यावर धानोरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुसºया अपघातात काकडवेली येथील निखील उसेंडी व रूपेश किरमे व कल्लो हे तीघेजण गोडलवाही येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून दुचाकीने स्वगावी येत होते. तर दल्लू उसेंडी हा सायकलने जात होता. दुचाकीस्वाराने सायकलस्वारास धडक दिल्याने यात सायकलस्वार दल्लू उसेंडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर निखील उसेंडी हा जखमी झाला. त्याला धानोरा रुग्णालयात भरती करण्यात आले. याबाबतची तक्रार धानोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत.
अपघातात एक ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:27 IST
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील जपतलाईपासून १ किमी अंतरावर घडली.
अपघातात एक ठार, तीन गंभीर
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात नोंद : जपतलाई, गोडलवाही येथील घटना