शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात एक ठार, चार जखमी

By admin | Updated: June 21, 2017 01:38 IST

कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली.

जामगिरी वळणावर अपघात : जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली. या अपघातात एक ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना १८ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास चामोर्शी-आष्टी मार्गावर जामगिरी वळणावर घडली. अ‍ॅड. डॉ. प्रवीण फुलझेले (४०) रा. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. तर जखमीमध्ये पत्रू झाडे (४०), मिलींद वाकडे (२३), कारचालक विजय अशोक दुर्गे (३५), महेश बोरकर (३५) सर्व रा. गडचिरोली अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. गोकुलनगर येथील विजय अशोक दुर्गे हे एमएच-३३-२८६ क्रमांकाची कार घेऊन अंत्यसंस्कारासाठी इतर चौघांना घेऊन गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून रात्रीच्या सुमारास गडचिरोलीकडे परत येत होते. जामगिरीनजीकच्या वळणावर अचानक समोरून अवजड वाहन आले. यामुळे वाहनचालक विजय दुर्गे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन तीन ते चारवेळा पलटले व रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकले. या अपघातात डॉ. प्रवीण फुलझेले हे जागीच ठार झाले. तर इतर जण जखमी झाले आहेत. मिलींद वाकडे यांच्या पायाला जबर मार लागला आहे. याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. काही जखमींना नागपूर येथेही हलविण्यात आले आहे.