शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचारी संपावर

By admin | Updated: August 25, 2014 23:58 IST

वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी, वन संरक्षणात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध

जंगल वाऱ्यावर : संपात शेकडो कर्मचारी सहभागीगडचिरोली : वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी, वन संरक्षणात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी वनरक्षक, वनपाल व अन्य वनकर्मचाऱ्यांनी सोमवार दि. २५ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. गडचिरोली वन विभागातील शेकडो वनकर्मचारी संपावर गेले आहेत.वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात आज सोमवारला राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागातील वनकर्मचारी २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. राज्यातील वनरक्षक व वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने १९७६ पासून सुरू असूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित केली जात आहे. मागील ३० वर्षांपासून वनमंत्री, वित्तमंत्री, वनराज्यमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी वेतन श्रेणी संदर्भात वारंवार चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेच्यावतीने निवेदन देऊन मागणी निकाली काढण्याची विनंतीही करण्यात आली. मात्र राज्यशासनाने वनरक्षक व वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा केली नाही. यावेळी वनरक्षक व वनपाल संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी वनरक्षक, वनपाल, वनमजूर संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने वेतन श्रेणी व अन्य विविध मागण्यांसाठी आज २५ आॅगस्टपासून सर्व वनकर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याचे माहितीचे पत्रही मुख्य वनसंरक्षकांना देण्यात आले.या संपात वनरक्षक, पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष किशोर सोनटक्के, केंद्रीय संघटक सुनील सोनटक्के, गडचिरोली जिल्हाध्यक्ष अरूण पेंदोरकर, विनोबा गराडे, मोतीराम चौधरी, संघटनेचे केंद्रीय सहसचिव गाजी शेख, रामचंद्र भनारकर, सुनिल पेंदोरकर, प्रकाश नैताम, रवी पेद्दीवार, अतुल धात्रक, गुरूदास टेकाम, सतिश मुच्चलवार, भाष्कर शेंडे, रेहाना शेख, कल्पना नैताम, नंदगीरीवार, दिकोंडवार, अनंता ठाकरे, राठोड, बन्सोड, आदे, अनिल सदुलवार, चव्हाण, राऊत, रेभणकर आदींसह शेकडो वन कर्मचारी सहभागी झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)