एक जखमी : सासुरवाडीत झाडावर चढून आंबे खाणे पडले महागमुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा येथील आंब्याच्या झाडावरून पडून एकाचा मृत्यू झाला तर धन्नूर येथे तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेला इसम झाडावरून पडल्याने जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.चामोर्शी तालुक्यातील बामनपेठ (मार्र्कं डा कं.) येथील राकेश कन्नाके (२५) हा मल्लेर येथे सासुरवाडीला आला होता. आंबा खाण्यासाठी झाडावर चढून आंबे खात असताना फांदी तुटून तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एक महिन्याआधीच राकेशचे लग्न झाले होते. तर दुसरी घटना धन्नूर येथे घडली. गुरूदास गोविंदा शेडमाके (५०) हे तेंदुची पाने तोडण्यासाठी झाडावर चढले असता त्यांचा तोल जाऊन ते झाडाखाली पडले. त्यांच्या कंबरेला मार लागल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती आता सुस्थितीत असल्याची माहिती मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
झाडावरून पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 01:01 IST