लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) तसेच नवेगाव (रै.) परिसरातील शेतकºयांनी यंदा मोठ्या प्रमाणात धानपिकाची लागवड केली. मात्र मावा, तुडतुडा रोगामुळे धानपीक नष्ट झाल्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.नवेगाव येथील शेतकरी रामदास आत्माराम भांडेकर यांनी आपल्या दीड एकर शेतजमिनीत धानपिकाची लागवड केली. मात्र सदर धानपीक ऐन गर्भात असताना तसेच लोंब फुटण्याच्या स्थितीत असताना मावा, तुडतुडा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. कीटकनाशकाची फवारणी करूनही काहीही परिणाम झाला नाही. कृषी सहायक पाटील, सरपंच उषा दुधबळे, ग्रामसेवक वासेकर, ग्रा. पं. सदस्य नरेंद्र सातपुते, कृषीमित्र युवराज सिडाम यांनी कृषी विभागामार्फत शेतीची पाहणी करून मोका पंचनामा केला. धान पीक नुकसानीचा अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहायक पाटील यांनी दिली आहे. लोकमतच्या प्रस्तूत प्रतिनिधींने धान पिकाची पाहणी केली असता, रामदास भांडेकर यांचे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
दीड एकरातील धान पीक नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:43 IST
चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) तसेच नवेगाव (रै.) परिसरातील शेतकºयांनी यंदा मोठ्या प्रमाणात धानपिकाची लागवड केली.
दीड एकरातील धान पीक नष्ट
ठळक मुद्देशेतकरी संकटात : नवेगाव रै. परिसरात मावा, तुडतुड्याचे थैमान