शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव मंदिरात साेमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने २८ फेब्रुवारीला मूल येथील सतुभैया नर्सिगदास सारडा  यांच्या हस्ते गंगापूजनास  सुरुवात होणार आहे. ०१ मार्च रोजी पहाटे ०४ वाजता शंकर महादेवाच्या शिवलिंग पिंडीची विधिवत महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे निमंत्रक खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित राहणार आहेत. पंकज पांडे, शुभांगी पांडे हे  सपत्नीक पूजेचे यजमान राहणार आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : काेराेनामुळे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरविण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी ५० नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजन केले जाईल, अशी माहिती मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी दिली आहे.  पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे व कर्मचारी उपस्थित होते. पुढे माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने २८ फेब्रुवारीला मूल येथील सतुभैया नर्सिगदास सारडा  यांच्या हस्ते गंगापूजनास  सुरुवात होणार आहे. ०१ मार्च रोजी पहाटे ०४ वाजता शंकर महादेवाच्या शिवलिंग पिंडीची विधिवत महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे निमंत्रक खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित राहणार आहेत. पंकज पांडे, शुभांगी पांडे हे  सपत्नीक पूजेचे यजमान राहणार आहेत. दर्शन रांगेमध्ये पहिला वारकरी असलेल्या भाविकांचा शाल व श्रीफळ देऊन देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात येणार आहे. ०२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता परंपरेनुसार व्याहाड येथील मारोती पाटील म्हशाखेत्री यांचे हस्ते टिपूर पूजन (दिवा लावणे) हाेईल. ०४ मार्च रोजी मार्कंडेश्वराची  समारोपीय महापूजा. जि.प. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, पत्नी साधना गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता मार्कंडेश्वराची शोभायात्रा पालखी काढण्यात येईल. भक्तांना भोजनदान केले जाणार आहे.दर्शनार्थी भाविकांना ऊन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी तात्पुरता कापडी मंडप उभारण्यात येणार आहे. पाण्याची सुविधा, भाविकांना अल्प  विश्रांतीसाठी तात्पुरते भक्त निवास व्यवस्था, महाप्रसाद वितरण मंडप व सूचना फलक ध्वनिक्षेपक राहील, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

काेराेनाचे नियम पाळले जाणार-    जिल्हा प्रशासनाने मार्कंडादेव जत्रेला परवानगी नाकारली असली तरी भाविकांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मार्कंडादेव ट्रस्टने तयारी केली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला काेराेना बाबतचे नियम पाळणे सक्तीचे केले जाणार आहे.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीtourismपर्यटन