शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

गडचिराेली नगर परिषदेची यावर्षीची मालमत्ताकराची मागणी २ काेटी ५० लाख ३९ हजार २०३ रूपये आहे. तर थकबाकी ४ काेटी ४२ लाख ९७ हजार ५६६ एवढी आहे. दरवर्षीच्या थकबाकीच्या तुलनेत जुनी थकबाकी दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. एकूण मागणी ६ काेटी ९३ लाख ३६ हजार ७७५ रूपये एवढी आहे. २४ मार्चपर्यंत ३ काेटी २७ लाख ९ हजार ६४४ रूपये एवढी वसुली झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ४७ टक्के एवढे आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दाेन वर्षे चाललेल्या काेराेना साथीचा माेठा परिणाम गडचिराेली नगर परिषदेच्या मालमत्ताकराच्या वसुलीवर झाला आहे. मालमत्ताकराची थकबाकी मागील वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे. नियमित मालमत्ताकराच्या मागणीपेक्षा थकबाकीची रक्कम दाेन पट अधिक आहे. कराची वसुली करताना कर्मचाऱ्यांची दमछाक उडत आहे.मालमत्ताकर हे नगर परिषदेचे स्वत:च्या उत्पन्नाचे साधन आहे. या उत्पन्नाचा उपयाेग नगर परिषद स्वत:च्या गरजेप्रमाणे वापरते. त्यामुळे या कराच्या वसुलीला फार महत्त्व असल्याने जास्तीत जास्त करवसुली हाेईल, याकडे नगर परिषदेचे प्रशासन प्रयत्न करीत राहते. काेराेना साथीच्या पूर्वी या कराची वसुली दरवर्षीच्या मागणीच्या जवळपास ८० टक्के राहत हाेती. मात्र, काेराेना साथीमुळे शहरातील अनेकांचे राेजगार गेले. याचा थेट परिणाम मालमत्ताकराच्या वसुलीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली नगर परिषदेची यावर्षीची मालमत्ताकराची मागणी २ काेटी ५० लाख ३९ हजार २०३ रूपये आहे. तर थकबाकी ४ काेटी ४२ लाख ९७ हजार ५६६ एवढी आहे. दरवर्षीच्या थकबाकीच्या तुलनेत जुनी थकबाकी दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. एकूण मागणी ६ काेटी ९३ लाख ३६ हजार ७७५ रूपये एवढी आहे. २४ मार्चपर्यंत ३ काेटी २७ लाख ९ हजार ६४४ रूपये एवढी वसुली झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ४७ टक्के एवढे आहे. 

दाेन पथकांची नियुक्ती मागील तीन महिन्यांपासून मालमत्ताकराची वसुली करण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत आहे. यासाठी दाेन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात सात ते आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी जाऊन मालमत्ताकराची वसुली करीत आहेत.  

काही मालमत्तांना ठाेकले सील

-    काही व्यावसायिकांकडे लाखाे रूपयांचा मालमत्ताकर थकीत हाेता. मात्र, ते वेगवेगळी कारणे सांगून कर भरत नव्हते. परिणामी, त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय पर्याय नव्हता. नगर परिषदेने आरमाेरी मार्गावरील एक मंगल कार्यालय तसेच एका दुकान गाळ्यांना सील ठाेकले. सील ठाेकताच संबंधितांनी कराचा भरणा नगर परिषदेत केला. त्यानंतर सील उघडण्यात आले.

नवीन नाेंदणीचे काम खासगी संस्थेकडे नवीन घराचे घरटॅक्स सुरू करायचे असल्यास त्याची पाहणी करण्याचे काम आता खासगी संस्थेला साेपविले आहे.

 

टॅग्स :Taxकर