लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट नजीकच्या शांतीनगर-मछली मार्गावरील अनेक रपट्यालगतचा रस्ता मागील पावसाळ्यात पुराने वाहून गेला. येथे गिट्टी उखडलेली आहे. परिणामी नागरिकांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शांतीनगर ते मछली मार्ग अडीच ते तीन किमी अंतराचा आहे. या मार्गावर असलेल्या अनेक नाल्यांवरील तसेच रपट्यावरील रस्ता मागील पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला. तसेच खडीकरण झालेल्या भागातीलही गिट्टी पूर्णत: उखडली. पावसाळा संपून जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, सदर मार्गाच्या डागडुजीसाठी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. परंतु दुर्लक्षच झाले. या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.पुलाच्या दोन्ही बाजूला पडले खड्डेशांतीनगर ते मछली मार्ग चापलवाडा-मकेपल्ली मार्गाला जोडतो. त्यामुळे मछलीवासीयांसाठी सदर मार्ग कमी अंतराचा आहे. याच मार्गाने मछली व परिसरातील नागरिक ये-जा करीत असतात. येथून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु मागील पावसाळ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने रपट्यालगचा रस्ता पूर्णता वाहून गेला. ठिकठिकाणी खड्डे पडले. शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना येथून आवागमन करणे कठिण झाले आहे. अनेक नागरिकांच्या वाहनांचे टायर उखडलेल्या गिट्टीमुळे पंक्चर होत आहेत. शिवाय या परिसरात दुरूस्तीच्या दुकानांचा अभाव असल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते. त्यामुळे प्रचंड त्रास होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर मार्गाची दुरूस्ती करून या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पुराने वाहून गेलेला रस्ता ‘जैैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:00 IST
चामोर्शी तालुक्यातील घोट नजीकच्या शांतीनगर-मछली मार्गावरील अनेक रपट्यालगतचा रस्ता मागील पावसाळ्यात पुराने वाहून गेला. येथे गिट्टी उखडलेली आहे. परिणामी नागरिकांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पुराने वाहून गेलेला रस्ता ‘जैैसे थे’
ठळक मुद्देदुरुस्तीकडे दुर्लक्ष : शांतीनगर-मछली मार्गाची दुरवस्था; वाहनधारकांना अडचण