शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनला हजेरी

By admin | Updated: November 11, 2016 01:19 IST

जिल्हा परिषद गडचिरोली येथे २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात पोलीस विभागाकडून वेगाने चौकशी सुरू झाली असून

बोगस शिक्षक बदली प्रकरण : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह सात जणांना बजावली होती नोटीसगडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली येथे २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात पोलीस विभागाकडून वेगाने चौकशी सुरू झाली असून या प्रकरणी पोलीस स्टेशनला भादंवि ४०९, ४२०, ४६८, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. आता गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांनी ४ नोव्हेंबर २०१६ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना पत्र देऊन सदर गुन्ह्याच्या तपासासंबंधाने जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत ३१ मे २०१३ नंतर झालेल्या बदल्यांची चौकशी करण्याकरिता उल्हास नरड (तत्कालीन शिक्षणाधिकारी), राऊत (तत्कालीन वित्त अधिकारी), सी. वाय. शिवणकर (सहायक प्रभारी अधिकारी पंचायत समिती धानोरा), अमोल रापुरकर (वरिष्ठ सहायक शिक्षण विभाग माध्यमिक), पी. सी. पराते (सहायक आरोग्य विभाग), अखिल श्रीरामवार (पंचायत समिती आरमोरी), फिरोज लांजेवार (पं.स. आरमोरी) यांना ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याबाबत समज देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती देताना तपास अधिकारी व गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी विजय पुराणिक यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व व्यक्तींना ४ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र देण्यात आले होते. यातील काही अधिकारी बदली होऊन गेले आहेत. सध्या मी उच्च न्यायालय नागपूर येथे आहे. यापैकी नेमके कोण आले होते. हे दस्तावेज बघूनच सांगावे लागेल, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व अनेक पदाधिकारीही सहभागी आहेत. त्यामुळे पोलिसांना आता त्यांचीही चौकशी करावी लागण्याची शक्यता आहे. अनेकांनी शिक्षकांकडून पैसे घेऊन या बोगस बदल्यांचा आकडा वाढविला होता. (जिल्हा प्रतिनिधी)