शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अनुपालनाकडे अधिकाऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:28 IST

पंचायत समितीच्या आढावा बैठकीदरम्यान आमदारांनी सुचविलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी अनुपालन करून त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षीत असले तरी गडचिरोली पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सूचनांना फारसे गंभीरतेने घेतले नाही.

ठळक मुद्देगडचिरोली पं.स.ची आमसभा : आमदारांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंचायत समितीच्या आढावा बैठकीदरम्यान आमदारांनी सुचविलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी अनुपालन करून त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षीत असले तरी गडचिरोली पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सूचनांना फारसे गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या आमसभेत ज्या समस्या मांडण्यात आल्या. या समस्या कायम असल्याचे गुरूवारी पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान दिसून आले. जुन्याच समस्यांवरील चर्चेवर सभेचा बराच वेळ गेला.गडचिरोली पंचायत समितीची आढावा बैठक गुरूवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, निता साखरे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, नगरसेवक प्रमोद पिपरे, पं.स. सदस्य मारोतराव इचोडकर, शंकर नैताम, रामरतन गोहणे, सुषमा मेश्राम, नेताजी गावतुरे, जानव्ही भोयर, अनिता मडावी, वाकडीचे सरपंच बोरकुटे, वसाचे उपसरपंच शंकर इंगळे आदी उपस्थित होते.सभेच्या सुरूवातीला अनुपालन अहवालावर चर्चा करण्यात आली. मागील सभेच्या वेळी रोलेक्स कंपनीचे संपूर्ण वीज मीटर बदलविण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर काळशी, मोहटोला, बोदेडा जि.प. शाळेला वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पाच हजारपैकी केवळ एकच हजार मीटर बदलविण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील मागणी केलेल्या सर्वच ग्रामपंचायतींना वाढीव पोल लावून देण्यात आले आहेत, अशी खोटी माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाला दिली.यावेळी काही जागरूक सरपंचांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीवर आक्षेप घेतला असता, आपण दिलेली माहिती ही केवळ मंजूर झालेल्या खांबाची होती, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. चुकीची माहिती सादर करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश आमदारांनी दिले.विहिरीसाठी द्यावे लागते १० टक्के कमिशनगडचिरोली तालुक्यात धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत एकूण ४३५ विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५४ विहिरी पूर्ण झाल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी आमसभेत उपस्थित एका सरपंचाने विहीर मंजूर करण्यापासून ते विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळेपर्यंत १० टक्के कमिशन अधिकारी घेत आहेत. ही बाब सभागृहासमोर मांडली. याला इतरही नागरिकांनी दुजारो दिला. यावर उपसभापतींनी सूचना करताना अधिकारी पैसे मागत असेल तर त्याची तक्रार पंचायत समितीकडे करण्यास सांगितले.