शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

१५७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:08 IST

चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगामाचे नियोजन : प्रत्येक बँकेला सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने रबी व उन्हाळी हंगामात फारशी शेती केली जात नाही. मात्र खरीप हंगामात पाऊस राहत असल्याने सर्वाधिक उत्पादन खरीप हंगामातच घेतले जाते. यावर्षी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीला सुरूवात केली आहे. ज्या शेतकºयांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला, असे शेतकरी आता नवीन कर्जासाठी बँकांकडे अर्ज करीत आहेत. कर्जासाठी कागदपात्रांची जुळवाजुवळ करण्याचे काम सुरू झाले आहे.चालू खरीप हंगामात १५७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाख, खासगी क्षेत्रातील बँकांना दोन कोटी रुपये व ग्रामीण तसेच जिल्हा सहकारी बँकांना ७७ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे.शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाही, अशी चुकीची समजूत बँक प्रशासनाची असल्याने बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होत्या. मात्र प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे आता बँकांनी काही प्रमाणात नरमाईचे धोरण अवलंबिले असल्याने शेतकºयांना कर्ज उपलब्ध होत आहे. पीक कर्ज ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे माफ केली जाते.शेतकºयाला केवळ कर्जाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकरी आता स्वत:हून कर्ज उचलून त्याचा भरणा करीत आहेत.कर्ज वितरण सुरूज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला आहे, असे शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत असल्याने त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. एक पाऊस पडल्यानंतर धानाचे पºहे टाकले जातात. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वीच बियाणे, खते यांची तजवीज करून ठेवावी लागते. जमीन सुध्दा नांगरून ठेवावी लागते. यासाठी पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचे अर्ज करण्यास बँकांकडे धाव घेतली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज