शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ओबीसींचे गडचिरोलीत धरणे

By admin | Updated: December 11, 2015 01:54 IST

जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून गुरूवारी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात पाच तास धरणे देण्यात आले.

गडचिरोली : जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून गुरूवारी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात पाच तास धरणे देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केले.यावेळी आंदोलनात युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविंद्र वासेकर, पांडुरंग घोटेकर, नारायण म्हस्के, दादाजी चुधरी, विजय वैरागडे, पंडीत पुडके, प्रभाकर वासेकर, पुरूषोत्तम म्हस्के, संजय निशाने, विनायक बांदुरकर, भास्कर नरूले, नामदेव उडाण, रमेश भुरसे, ऋषीकांत पापडकर, अनिल पाटील म्हशाखेत्री, जी. व्ही. बानबले, विजय कोतपल्लीवार, किर्तीकुमार मासुरकर, सिध्दार्थ नंदेश्वर, रूमाजी भांडेकर, नामदेव खोब्रागडे, जनार्धन साखरे, दिलीप उरकुडे, शामराव वाढई, रामू निलेकार, दिनकर भगत, मुखरू कडवे, विश्वनाथ उरकुडे, होनाजी मोहदेकर, शंकर लडके, देवानंद चुधरे, पंकज गुड्डेवार, रजनिकांत मोटघरे, गौरव नैताम, निळकंठ कोलते, माधव नैताम, राजेंद्र हिवरकर, सुरेश मांडवगडे, सागर म्हशाखेत्री, विलास म्हशाखेत्री, कमलाकर लडके, रामू जक्कनवार, दत्तात्रय खरवडे, केवलराम सालोटकर, लक्ष्मण मांडवकर, रवी म्हशाखेत्री, राकेश गणवीर आदी उपस्थित होते. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० नुसार ओबीसींना एससी, एसटी प्रमाणे घटनात्मक दर्जा दिलेला आहे. असे असतानाही ओबीसींची स्वतंत्र सूची केल्या जात नाही. जातनिहाय जनगणना करूनही ओबीसींची जनगणना नाकारण्यात आली आहे. अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद नाही. ओबीसींचा नोकरीचा अनुशेष पूर्ण केला जात नाही. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग नोकर भरतीमध्ये सुप्रिम कोर्टाने मान्य केलेली मंडल आयोगाची शिफारस नाकारल्या जाते. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठीची फ्रिशिपची मर्यादा ६ लाख करण्याचा निर्णयही प्रलंबित आहे. स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले नाही, असे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात गैरआदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे, अशी गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळण्यात यावे, राज्यपालांच्या ९ जून २०१४ च्या अधिसूचनेत सुधारणा करून सर्व प्रवर्गातील स्थानिकांना नोकरभरतीत प्राधान्य देण्यात यावे, परदेशी उच्च शिक्षणाकरिता ओबीसी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात यावी. आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)