शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीबहुल गावे पेसामुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:52 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हा ओबीसींवर अन्याय आहे. संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केल्याने ओबीसी युवकांचा नोकरीतील संधीचा मार्ग बंद झाला.

ठळक मुद्देखासदारांचे आश्वासन : लखमापूर बोरी येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हा ओबीसींवर अन्याय आहे. संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केल्याने ओबीसी युवकांचा नोकरीतील संधीचा मार्ग बंद झाला. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करून ओबीसी लोकसंख्या असलेली गावे पेसामुक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खा. अशोक नेते यांनी दिली.चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे जय शिवाजी सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, लखमापूर बोरीचे सरपंच संजय दुधबळे, नरेश अल्सावार, सातुपते व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. खा. नेते पुढे म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून ५१ टक्केच्यावर आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना पेसामध्ये व ५१ टक्केच्यावर ओबीसी असलेल्या गावांना पेसामुक्त करून ओबीसी युवकांना नोकरी भरतीमध्ये पूर्ववत १९ टक्के आरक्षण देण्यात यावी, ही मागणी घेऊन आपण १८ सप्टेंबरला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करून नव्याने जीआर काढण्याची मागणी करणार. तसेच नोकर भरतीत केवळ १२ पदे नाही तर सर्व पदांना पेसा क्षेत्रातून वगळण्याची मागणी शासनाकडे रेटून धरणार असल्याचे ते म्हणाले. तसेच चामोर्शी तालुक्यातील विकासकामे प्राधान्यांने मार्गी लावणार, अशी ग्वाही खा. अशोक नेते यांनी यावेळी दिली.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीAshok Neteअशोक नेते