शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण भीक नसून हक्क आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:51 IST

१९३१ ला झालेल्या जनगणनेनुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले. तेव्हापासून जनगणना झालेली नाही.

ठळक मुद्देआष्टीत समाज प्रबोधन कार्यक्रम : अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन; सरकारवर घणाघाती टिका

आॅनलाईन लोकमतआष्टी : १९३१ ला झालेल्या जनगणनेनुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले. तेव्हापासून जनगणना झालेली नाही. उच्च वर्णीयांनी सतत ओबीसींवर अन्याय केला आहे. आपले हक्क माहित करून घेण्यासाठी भारतीय संविधान वाचणे गरजेचे आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यास तयार व्हावे लागेल. ओबीसींचे आरक्षण ही भीक नसून तो हक्क आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मीटकरी यांनी केले.ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आष्टी येथे संविधान दिन व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन समारोह तथा ओबीसी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम रंगमंचावर सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट चंद्रपूरचे अध्यक्ष बळीराज धोटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रूचित वांढरे, पोलीस उपनिरीक्षक नितेश गोणे, प्रा. दिनकर हिरादेवे, प्रा. नारायण बोरकुटे, संजय पंदिलवार आदी उपस्थित होते.डॉ. आंबेडकर, म. फुले, शाहू महाराज व तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुढे बोलताना अमोल मीटकरी म्हणाले, आमचे लोकप्रतिनिधी हे जातीचे असले पाहिजे, ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांनी बोलले पाहिजे, धार्मिक शोषणातून ओबीसींना मुक्त केले पाहिजे, राजकीय घराणेशाही नष्ट होणे आवश्यक असून ओबीसींचा नेता प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे, देश वाचविण्यासाठी ओबीसींना राजकीय पर्याय उभा करायला पाहिजे, असे मीटकरी यावेळी म्हणाले. ‘लढतो तो मावळा आणि निवडून येतो तो कावळा’, अशी टिका त्यांनी राज्य सरकारवर केली.बळीराज धोटे यांनी ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसींतील सर्व पोट जातींनी एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी प्रा. शेषराव येलेकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. नारायण बोरकुटे, संचालन प्रा. रवींद्र इंगोले यांनी केले तर आभार प्रा. नारायण सालुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला आष्टी परिसरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.