शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात आजवर रस्त्यावर उतरून कष्टकरी कामगारांचे अनेक लढे यशस्वीपणे लढले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात आजवर रस्त्यावर उतरून कष्टकरी कामगारांचे अनेक लढे यशस्वीपणे लढले असून जिल्ह्यातील ओबीसींच्या हक्कासाठी शेकाप रस्त्यावरची लढाई लढणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केले. ते खंडाळा येथील नवयुवक मंडळाद्वारा कार्तिक एकादशी निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे,रमेश चौखुंडे, राजू केळझरकर,प्रदिप आभारे, माजी पं.स.सदस्य प्रमोद भगत, सेलोकर, भेंडाळाचे पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, घारगावचे पोलीस पाटील आभारे, गुरुदेव सातपुते जानकीराम ढोबे, नरेश पोरटे, नोमाजी सातपुते, प्रमोद गोलार्वार, भैय्याजी मंगर, बालाजी झोडक उपस्थित होते.रामदास जराते पुढे म्हणाले, ओबीसींच्या हक्कासाठीचे आंदोलन तिव्र करण्याची गरज असून मोठ्या संख्येने तरुणांनी रस्त्यावर उतरावे, या संघषार्साठी लागणारी राजकीय ताकद शेकाप पुरवेल तसेच येणाऱ्या काळात विधिमंडळात जिल्ह्यातून ओबीसींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूकीचे राजकारण करेल, असे जराते म्हणाले. यावेळी सेलोकर गुरुजी, प्रमोद भगत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उंदिरवाडे तर प्रास्ताविक गुरुदेव सातपुते यांनी केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती