शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

हक्कासाठी ओबीसी समाज एकवटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींची कमी केलेले आरक्षण, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती, वसतिगृह आदींसह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी व न्यायहक्कासाठी ओबीसी ...

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींची कमी केलेले आरक्षण, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती, वसतिगृह आदींसह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी व न्यायहक्कासाठी ओबीसी बांधवांचा विशाल माेर्चा गडचिराेली येथे २२ फेब्रुवारी राेजी काढण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आला.

ओबीसी समाज संघटनेची महत्त्वपूर्ण सभा साेमवारी सायंकाळी गडचिराेली येथे पार पडली. या सभेत ओबीसींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सभेला रमाकांत ठेंगरी, सुरेश भांडेकर, अजय कंकडलावार, रमेश बारसागडे, प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर मशाखेत्री, महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रा. शेषराव येलेकर, भास्कर बुरे, पंकज खोबे, अनिल कोठारे, प्रशांत वाघरे, सतीश विधाते, दादाजी चापले, दादाजी चुधरी, प्रा देवानंद कामडी, रमेश भुरसे, प्रा. डॉ. रामचंद्र वासेकर, मारोती दूधबावरे, पांडुरंग भांडेकर, दत्तात्रय खरवडे, राजेंद्र उरकुडे, विठ्ठलराव कोठारे, रामराज करकाडे, नंदू नाकतोडे, पंकज धोटे, गोपाल घोगडे, जितेंद्र मुनघाटे, अजय लोंढे, धनपाल मिसार, विलास चुधरी, सचिन गोंगाल, रमेश चौधरी, रूचीत वांढरे, रामेश्वर खोब्रागडे, प्रशांत बनकर, मनोज निंबारते, नरेंद्र भरडकर, भाऊराव पोरटे, संतोष गझलपल्लीवार, नेताजी बारसागडे, श्यामराव वाढई, मनोज पोरटे, किशोर ठाकरे, विनायक बंदूरकर, पांडुरंग घोटेकर, विनायक झरकर, शंकर सालोटकर आदी उपस्थित हाेते.

बैठक यशस्वीतेसाठी शंकर पारधी, प्रा. दामोधर सिंगाडे, ज्ञानदेव पिलारे, लोकमान्य बरडे, बुल्ले, लोमेश राऊत, किरण कारेकर, देवरावजी मोहुर्ले, योगेश सोनुले, पुरुषोत्तम लेंगुरे, प्रभाकरजी कोटरंगे, केशव निंबोड, हरिदास कोटरंगे, शंकर चौधरी, महादेव वाघे, धनराज चुधरी, मंगेश चुधरी, मंगेश भोयर, योगेश नैताम, प्रशांत किरमे, संजय लोणारे, प्रा.पुरुषोत्तम ठाकरे, सुधीर झुंजाळ, संजय घोटेकर, रोशन भोयर अक्षय जककुनवार, बंडू सातपुते, पालाश भोयर, प्रवीण ठेंगरी, चेतन भोयर, वामन कीनेकर, सदाशिव वाघरे, राहुल मुनघाटे, विलास मस्के, मुक्तेश्वर काटवे, गणेश मूलकलवार, राजेंद्र आडे, संतोष मोहुर्ले, सुखदेव जेंघटे, रत्नदीप मशाखेत्री, प्रमोद भगत, देवराव चावळे यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.

बाॅक्स ...

या मागण्यांवर विस्तृत चर्चा

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी आरक्षणात मराठा समाजासह इतर काेणत्याही समाजाचा समावेश करू नये, गडचिराेली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, एससी, एसटी समाजाप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्यात यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.