शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

जि.प.समोर नर्सेस संघटनेचे उपोषण

By admin | Updated: July 16, 2014 00:11 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्नीत जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्यावतीने मंगळवारपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्नीत जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्यावतीने मंगळवारपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, सचिव निलू वानखेडे, कोषाध्यक्ष बेबी वड्डे, कोषाध्यक्ष रामटेके व शकुंतला वेलादी आदी पाच नर्सेस आमरण उपोषणाला बसले आहेत. नर्सेस संघटनेच्या शिष्टमंडळाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात १०० टक्के नर्सेसना नियमित व स्थायी करण्याचे आदेश देण्यात यावे, एकाच पदावर १२ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या आरोग्य सहाय्यीका व आरोग्य सेविका यांना कालबध्द पदोन्नती देण्यात यावी, नर्सेस कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन ५ तारखेच्या आत देण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करण्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात यावे, एनआरएचएम अंतर्गत मिळणारी वार्षिक देखभाल निधी व बळकटीकरण याकरीता एएनएम व सरपंच यांचा संयुक्त बँक खाते असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे एएनएमच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावी आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. चंपा उईके, माधुरी राळेकर, रूकमा वनसकर, विद्या पाथरडे, शशी वादीकर, संगिता पेशट्टीवार, सुलोचना कुनघाडकर, ज्ञानेश्वरी कोल्हेकर आदी नर्सेसनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे. उपोषणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)