शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या वाढली

By admin | Updated: August 10, 2016 01:44 IST

तालुक्यातील वघाळा जुना येथे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी येतात.

पर्यटन स्थळ म्हणून उपेक्षित : वघाळा जुना येथील वैनगंगा नदीतीरावर वास्तव्य महेंद्र रामटेके आरमोरी तालुक्यातील वघाळा जुना येथे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी स्थलांतरीत पक्षी येतात. जून व जुलै महिन्यात गावातील चिंचेच्या झाडावर घरटी बांधून, अंडी घालून पिल्ल्यास जन्म देतात. ही परंपरा गेल्या ३०-४० वर्षांपासून कायम आहे. यावर्षीसुद्धा स्थलांतरीत पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या ८ ते १० हजारांच्या आसपास आहे. मात्र स्थलांतरीत पक्ष्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वघाळा हे पक्षी पर्यटन स्थळ म्हणून आजही उपेक्षित आहे. आरमोरीजवळील वैनगंगा नदीतीरावर जुना वघाळा गाव वसलेले आहे. हे गाव पूर बाधित आहे. या गावात चिंचेच्या झाडांची संख्या जवळपास ५० वर आहेत. नदीकिनारा, शेत आणि चिंचेचे मोठे झाड यामुळे नैसर्गिक सौंदर्य या गावाला लाभले आहे. या गावात स्थलांतरी पक्ष्यांचा ओघ वाढलेला आहे. पाणी आणि चाऱ्याची मुबलकता या गावात असल्यामुळे दरवर्षी पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या गावात विविध जातीचे विदेशातून आलेले पक्षी गुण्यागोविंदाने राहत आहेत. गावातील संपूर्ण चिंचेचे झाड पक्ष्यांच्या थव्यांनी वेढलेले आहे. स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांनी झाडावर घरटी बांधून व अंडी घालून पिल्ल्यांना जन्म दिला. त्यामुळे पक्ष्यांची संख्या जवळपास ८ ते १० हजारांपर्यंत पोहोचली आहे. स्थलांतरीत पाहुण्या पक्ष्यांचे गाव म्हणून वघाळा जुना या गावाची ओळख निर्माण झाल्याने दरवर्षी पक्षी मित्र व बाहेरील अनेक लोक पक्षी पाहण्यासाठी या गावाला भेटी देत असतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षी असलेले गाव पक्षी पर्यटन स्थळ म्हणून आजही उपेक्षित आहे. वघाळा जुना गावातील विकासात्मक कामे पूर्ण करून नव्याने निधी देण्यात यावा, तसेच पक्षी पर्यटन स्थळ म्हणून या गावाला घोषित करावे, अशी मागणी वन्यजीव पक्षी संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, रामकृष्ण धोटे, संदीप प्रधान, धनराज दोनाडकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. शासन व प्रशासनाने वघाळा गावाला पर्यटन स्थळ घोषित करून विकास करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. निधीअभावी पार्कचे काम रखडले गावातील नागरिक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत. त्यामुळे पक्ष्यांना कोणताही धोका नसल्यामुळे स्थलांतरीत पक्षी दरवर्षी येथे वास्तव्याने येत आहेत. पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून छोटासा पार्क वन विभागाच्या वतीने तयार करण्यात येत असून निधीअभावी सदर काम अर्धवट स्थितीत थांबलेले आहे. सदर काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या जातींच्या पक्ष्यांचे आहे वास्तव्य वघाळा जुना येथील वैनगंगा तिरावर तसेच चिंचेच्या झाडांवर ओपन बील स्टॉर्क, ब्लॅक कारमोरंट, व्हाईट आयबीस, चेस्टनट बिटर्न, कॅटक इग्रेट, करकोचा, पेन्टेड स्टार्क अशा विविध देशी, विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन जुना वघाळा येथे झालेले आहे. वघाळा जुना येथील वैनगंगा नदीतीरावर, चिंचेच्या झाडावर गावाच्या सभोवताल मोकळ्या जागेवर स्थलांतरीत पक्ष्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे.