शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एनएसयूआय आंदोलन करणार

By admin | Updated: July 14, 2016 01:13 IST

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर : करिश्मा ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय गडचिरोली : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. शिष्यवृत्ती व निर्वाह भत्त्याची प्रलंबित रक्कम, आयटीआय प्रवेश शुल्कात वाढ तसेच इतर समस्यांमुळे विद्यार्थी हैराण आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन काँग्रेस प्रणीत एनएसयूआय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार, असा एकमुखी निर्णय एनएसयूआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी झालेल्या या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एनएसयूआयच्या महाराष्ट्र प्रभारी करिश्मा ठाकूर होत्या. यावेळी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव पंकज गुड्डेवार, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे गडचिरोली शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआय अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना करिश्मा ठाकूर म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. भाजप प्रणीत सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. भाजपप्रणीत सरकारकडून शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. काँग्रेस व एनएसयूआय विद्यार्थ्यांवरील सदर अन्याय कधीही खपवून घेणार नाही. विद्यार्थी प्रश्नांच्या आंदोलनात एनएसयूआय च्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही ठाकूर यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याच्या गावागावात एनएसयूआयच्या शाखा स्थापन करून एनएसयूआयचे संघटन मुजबूत करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक गौरव अलाम, संचालन अमिता मडावी यांनी केले आभार विवेक घोंगडे यांनी मानले. याप्रसंगी ऐजाज शेख, सचिन राठोड, सादुलवार, अभिजीत धाईत, चैतन्य अर्जुनवार, तौफिक शेख, नचिकेत जंबेवार, कुळमेथे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)