शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नरेगाचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

बाह्यस्थ पध्दतीने खासगी संस्थेकडून रोजगार हमी योजनेच्या कामात कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेचा विरोध करून

जिल्हा कचेरीसमोर धरणे : बाह्यस्थ खासगी संस्थेकडून कर्मचारी निवडीस विरोध लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बाह्यस्थ पध्दतीने खासगी संस्थेकडून रोजगार हमी योजनेच्या कामात कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेचा विरोध करून आपल्या अधिकार व हक्कासाठी नरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा मुख्यालयी एल्गार पुकारला. १०० वर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. जिल्हा सेतू समितीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात देण्यात येणारे आदेश पूर्वीप्रमाणेच सेतू समितीमार्फत देण्याची पध्दत सुरू ठेवावी, नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे संरक्षण देऊन मिळत असलेले एकत्रित मानधन कायम ठेवण्यात यावे, जाहिरातीमध्ये दिलेली निविदा रद्द करून पूर्वीप्रमाणे जिल्हा सेतू समितीमार्फत नरेगाच्या सर्व कंत्राटी कर्मचऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, कार्यरत कर्मचऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन पुनर्नियुक्ती आदेश द्यावे, जुलै २०१६ ते आजपर्यंतचे आठ टक्के वाढीचे रोखीव वेतन तत्काळ काढण्यात यावे आदी मागण्यांसाठी बाराही पंचायत समितीस्तरावरील नरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याशी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे १९ मे शनिवारपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिला आहे. या आंदोलनात भास्कर राऊत, संजय खोबे, पंकज खरवडे, गोविंद पुनमवार, विजय भेडके, शैलेश लाड, मोहन बोदेले, विनोद नाकतोडे, ऋषी निकोडे, अविनाश खेवले, राजेंद्र भानारकर, अष्टशील कांबळे, मनोज पडीशालवार आदीसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.