शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

न.प. शाळांच्या शिक्षकांचे वेतन थकले

By admin | Updated: March 14, 2015 00:19 IST

येथील नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षकांना मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

गडचिरोली : येथील नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षकांना मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या शिक्षकांना मागील १७ वर्षांपासून पदोन्नती मिळाली नसून, चट्टोपाध्याय वेतनश्रेणीची रक्कम येऊनही पाच वर्षांपासून शिक्षकांना झुलवत ठेवण्यात येत असल्याने नगर परिषद प्रशासनाप्रती कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.गडचिरोलीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर १९९८ मध्ये शहरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. तेव्हापासून नगर परिषदेने शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात नगर परिषदेतर्फे चालविण्यात येणाऱ्या १० शाळा असून, ५१ शिक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रामनगर येथील जवाहरलाल नेहरु उच्च प्राथमिक शाळेला अलिकडेच आयएसओ मानांकन मिळाले आहे. शिक्षण विभाग, नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. नगर परिषद शाळांतील शिक्षकांना दरमहा वेतन मिळत नाही. मागील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे वेतनाबरोबरच या शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणीची थकबाकीही मागील ५ वर्षांपासून अदा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ही रक्कम शिक्षण उपसंचालकांकडून नगर परिषदेला आधीच प्राप्त झालेली आहे. या शिक्षकांना पदोन्नतीच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)