शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

न.पं. अध्यक्षपदाचे दावेदार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:36 IST

स्थानिक नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेकरीता राखीव आहे. येथे या प्रवर्गातील दोनच महिला असल्याने सत्ताधारी व विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देकुरखेडात उपाध्यक्षपदासाठी प्रचंड चुरस : दोन्ही गटाकडून उपाध्यक्षपदासाठी ओढाताण सुरू

सिराज पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेकरीता राखीव आहे. येथे या प्रवर्गातील दोनच महिला असल्याने सत्ताधारी व विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र खरी चूरस उपाध्यक्ष पदाकरीता असून दोन्ही गटाकडून एकापेक्षा अधिक नावे समोर येत असल्याने गटांतर्गत कुरखेडात मोठी चुरस निर्माण झाली आहे.येथे मागील वेळी शिवसेना काँग्रेस व अपक्षांनी आघाडी तयार करीत अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोन्ही पदे बळकावली होती. मात्र यावेळी विरोधी भाजपप्रणित गटाने अपक्ष शाहेदा मुघल यांना आपल्या तंबुत दाखल करीत थेट अध्यक्षपदाचा उमेदवार बनविण्याची तयारी सूरू केली आहे तर सत्ताधारी गटाकडून काँग्रेसच्या आशा तुलावी ह्या एकमेव दावेदार आहेत. येथे लढत अटीतटीची असून बहुमताचा आकडा कुणाकडेही झूकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही गटाकडून अध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित असले तरी उपाध्यक्ष पदाकरीता मोठी चूरस आहे. अध्यक्ष पद महिलेकरिता राखीव असल्याने उपाध्यक्षपदाकरीता दोन्ही गटाकडून पुरूष उमेदवारांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.भाजपकडून गटनेते नागेश फाये, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, कंत्राटदार रवींद्र गोटेफोडे तसेच सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांचे खंद्ये समर्थक अ‍ॅड. उमेश वालदे यांचे नावे चर्चेत आहेत. यात सर्वांचे दावे मजबूत आहे. फाये यांचे कुटुंबीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे तर हूसैनी यांची अध्यक्ष पदाची संधी मागील वेळी थोडक्यात हूकली होती, त्यामुळे यावेळीही ते दावेदार ठरू शकतात. गोटेफोडे हे सुद्धा अनुभवी राजकारणी आहेत तर अ‍ॅड वालदे यांच्यावर पोरेड्डीवार गटाचा शिक्का असला तरी त्यानी पक्षाअंतर्गत अन्य गटाशीही जुळवून घेतले असल्याने त्यांचा ही दावा नाकारता येत नाही. मात्र भाजपात शिस्तीला महत्व असल्याने पक्ष आदेश देईल, तोच उमेदवार ठरेल अशी चर्चा आहे.सत्ताधारी गटाकडून अध्यक्ष पदाची उमेदवारी काँग्रेसला देण्यात येणार असल्याने उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा राहणार आहे येथे विद्यमान पाणी पुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, बांधकाम सभापती संतोष भट्टड हे दावेदार असले तरी शिवसेना जिल्हा प्रमुखांचा शब्द अंतिम राहणार आहे. एकमत न झाल्यास विद्यमान नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी हे सुद्धा उपाध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात. कुरखेडात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक