शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

न.प. संकुलातील व्यावसायिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:50 IST

गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता.

ठळक मुद्देदुर्लक्ष : पार्र्किं गझोन नसतानाही संकुल परिसरात रविवारी आॅटो व दुचाकींची राहते गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. २४ सप्टेंबर रोजी रविवारच्या आठवडी बाजारादरम्यान चोख पोलीस बंदोबस्तात नो पार्र्किंग झोनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आता दर रविवारी नगर पालिकेच्या संकुल परिसरात आॅटो व दुचाकी मोठ्या संख्येने उभ्या केल्या जात असल्याने व्यावसायिकांसह संकुल मागील परिसरात वस्ती असलेले नागरिक त्रस्त झाले आहेत.गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजारासाठी दर रविवारी गडचिरोलीत येत असल्याने आठवडी बाजारात प्रचंड गर्दी राहते. विशेष म्हणजे, गडचिरोली शहरातील आठवडी बाजार गडचिरोली-मूल या राष्टÑीय महामार्गाच्या अगदी बाजूला भरतो. बाजारासाठी आलेले नागरिक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या बाजूला ठेवत होते. दोन्ही बाजूला दुकाने, त्याच्यासमोर दुचाकी वाहने व रस्त्यावरून आठवडी बाजारातील विक्रेते तसेच नागरिकांची गर्दी यामुळे या ठिकाणी दिवसभर वाहतुकीची कोंडी होत होती. गडचिरोली शहर वाहतूक शाखेने मागील आठ महिन्यांपासून आठवडी बाजाराच्या दिवशी एसटी वगळता ट्रक व इतर मोठी वाहने शहरातून नेण्यास प्रतिबंध घातला होता. इंदिरा गांधी चौक व न्यायालय परिसरात एक वाहतूक पोलीस ठेवून या मार्गाने येणारी वाहने सेमाना मार्गे वळविली जात होती. वाहतूक शाखेचा हा प्रयोग यशस्वी झाला व याची अंमलबजावणी प्रत्येक आठवडी बाजाराच्या दिवशी केली जात आहे. मात्र शहरातून चारचाकी वाहने, बस जात असल्याने वाहतुकीची कोंडी होतच होती.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद व शहर वाहतूक पोलीस शाखेने आठवडी बाजार परिसरातील मुख्य रस्त्याच्या बाजूचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून जाहीर केला. याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दररविवारी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. रस्त्याच्या मच्छी बाजाराच्या बाजुने लालपट्टी लावून त्यावर प्रत्येक ठिकाणी नो पार्र्किंग झोन अशी सूचना दर्शविणारे फलक लावण्यात येत आहे.बाजार परिसरात ध्वनीक्षेपकाच्या मदतीने पार्र्किंग झोन कुठे आहे, या विषयची माहिती दिली जाते. पार्र्किंग झोनच्या कडक अंमलबजावणीने वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला. मात्र शहर व तालुक्यातील अनेक नागरिक न. प. संकुल परिसरात वाहने लावत असल्याने व्यावसायिक व गंगा नगरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहे. त्यांना रस्ता मिळत नाही.