शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

न.प. सभापतींची होणार खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:46 IST

गडचिरोली नगर पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या २२ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. २१ जानेवारी रोजी सोमवारला गडचिरोली पालिकेत विशेष सभा बोलविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२१ ला सभापतींची निवडणूक : अनेक जण उत्सुक, महिलाही सूत्र स्वीकारण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या २२ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. २१ जानेवारी रोजी सोमवारला गडचिरोली पालिकेत विशेष सभा बोलविण्यात आली आहे. या सभेत पालिकेचे नवे सभापती ठरणार आहेत. या निवडणुकीत जुन्या सभापतींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याने खांदेपालट होणार असल्याचे बोलले जात आहे.गडचिरोली पालिकेत बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, महिला व बालकल्याण, नियोजन विकास आदी सहा सभापतींची निवड केली जाते. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी एका महिला नगरसेविकेची निवड केली जाते. गडचिरोली पालिकेत एकूण १२ प्रभाग मिळून २५ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपाचे २३, काँग्रेसचा एक व समाजवादी पार्टीचा एक असे पक्षीय बलाबल आहे.सभापती निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी १२ ते २ या वेळेत पक्षाचे गटनेते सभापती पदासाठीच्या उमेदवाराची यादी पिठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करतील. त्यानंतर इच्छुक उमेदवार सभापतीपदासाठी नामंकन सादर करतील. एका पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज आल्यास निवडणूक घेतली जाईल. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बांधकाम व आरोग्य तथा स्वच्छता, तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद महत्त्वपूर्ण आहे. सदर विषय समितीचे सभापतीपद मिळविण्यासाठी अनेक नगरसेवकांची इच्छा असते. आताही महत्त्वाचे सभापतीपद मिळविण्यासाठी अनेकांकडून फिल्डींग लावली जात आहे. नगर पालिकेच्या कायद्यानुसार सभापतीपदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व तीन स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र नगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य बैठकीला उपस्थित राहू शकतात.महिलांचे संख्याबळ जास्तगडचिरोली नगर पालिकेची स्थापना ३१ मे १९८५ ला झाली. त्यानंतर १९८५ ते १९९१ पर्यंत या पालिकेवर प्रशासन होते. त्यानंतर १९९१ मध्ये नगर पालिकेची पहिली निवडणूक पार पडली. पालिकेच्या निर्मितीला ३३ वर्ष पूर्ण होत असले तरी २७ वर्षांच्या कार्यकाळात सहा वेळा निवडणूक झाली आहे. ५० टक्के आरक्षणानुसार गडचिरोली पालिकेत नगरसेवक म्हणून १३ महिलांना संधी मिळाली आहे. पालिकेत १२ पुरूष नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष मिळून महिलांचे संख्याबळ पुरूषांपेक्षा अधिक आहे.महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधीच नाहीनगर पालिकेतील महिला व बालकल्याण हे पद महिलांसाठी राखीव आहे. गडचिरोली पालिकेच्या २७ वर्षांच्या कार्यकाळात एकाही नगरसेवक महिलेला बांधकाम, आरोग्य व स्वच्छता तसेच पाणीपुरवठा या महत्त्वाच्या सभापतींचे पद मिळाले नाही. शिक्षण समितीचे सभापतीपदही यापूर्वीच्या कार्यकाळात महिला नगरसेवकाला मिळाले नाही. पालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर गतवर्षी एका नगरसेवक महिलेला शिक्षण समितीचे सभापतीपद देण्यात आले. एकूणच पालिकेच्या सत्तासूत्रात महिलांना अपेक्षित स्थान मिळाल्याचे दिसून येत नाही. नगरसेवकपदासाठी ५० टक्के महिला आरक्षण असतानाही सभापतीपदावर मात्र बºयाच वेळा पुरूष नगरसेवकांचीच वर्णी लावल्या जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका