शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता उमेदवारी अर्जही आॅनलाईन

By admin | Updated: December 3, 2014 22:50 IST

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका व ३८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २३ डिसेंबरला मतदान होणार असून, ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज

२३ डिसेंबरला : जिल्ह्यात ४७ ग्रामपंचायतीची निवडणूकगडचिरोली : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका व ३८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २३ डिसेंबरला मतदान होणार असून, ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्रथमच आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.जिल्ह्यातील कुरूमपल्ली, मांढरा, वेंगणूर, देवदा, वाघेझरी, जव्हेली खुर्द, जव्हेली (बु.) व नागुलवाडी या ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका होणार आहेत; तर ३८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. सदर निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्रे दाखल करतात, ती आॅनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे. आवेदनपत्रे आॅनलाईन पद्धतीने भरण्यासाठी संग्राम कक्ष मदत करणार असून, अर्ज भरून देण्यासाठी संग्राम कक्ष केवळ २० रूपये फी आकारणार आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचे मतदान इव्हीएम यंत्रांद्वारे घेण्यात येईल. या यंत्रावर नोटा बटनाची सुविधा असणार आहे.४ ते ८ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते ३ पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याची मुदत आहे. ९ डिसेंबरला अर्जांची छाननी, ११ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची दिनांक, त्याच दिवशी चिन्हांचे वाटप व गरज पडल्यास २३ डिसेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी ३ या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ डिसेंबरला होणार असून, मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आयोगाने प्रशिक्षण दिले. ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया संगणकीकृत करण्याच्या दिशेने आयोगाने पावले टाकली असून, आॅनलाईन अर्ज भरणे पहिले पाऊल आहे. या प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)