शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आता अंगणवाडी केंद्र द्विशिक्षकी होणार

By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST

बालमनावर संस्कार करण्यासोबतच बालकांच्या आरोग्याची निगा राखत सकस आहाराचा पुरवठा करणाऱ्या अंगणवाडी केंद्रात एकच शिक्षिका (अंगणवाडी) सेविकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिराज पठाण - कुरखेडाबालमनावर संस्कार करण्यासोबतच बालकांच्या आरोग्याची निगा राखत सकस आहाराचा पुरवठा करणाऱ्या अंगणवाडी केंद्रात एकच शिक्षिका (अंगणवाडी) सेविकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे एकाच अंगणवाडी सेविकांवर विविध बैठकांसह बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. यामुळे कार्यरत एकच सेविकेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाने आता प्रत्येक अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त सेविका नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवड प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.कार्यरत अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्रातील नियमित कामाव्यतिरिक्त कार्यालयीन विविध बैठका, गावातील सर्व्हेक्षण तसेच गरोदर व प्रसुत मातांची काळजी घेण्यासाठी त्यांना आहार पुरवठा करणे आदी जबाबदारी पार पाडावी लागते. अंगणवाडी केंद्रातील एकाच अंगणवाडी सेविकेला लिखान कामही करावे लागते. या सर्व कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त कामाचा भर पडत होता. यामुळे अंगणवाडी केंद्रातील व्यवस्था प्रभावीत होत होती. अंगणवाडी केंद्राच्या कारभारात सुसुत्रता यावी, पूर्व प्राथमिक अध्यापनाचे कार्य निरंतर सुरू राहावे, यासाठी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयाने महाराष्ट्र राज्यातील निवडक २० जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अतिरिक्त सेविकांची नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ७७१ तसेच कुरखेडा तालुक्यातील एकूण १४१ अंगणवाडी केंद्रात अतिरिक्त सेविकांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान संबंधीत सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पात्र महिलांकडून अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या अर्जाची छाणणी व निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका रूजू होणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे तसेच अंमलबजावणीमुळे अंगणवाडी केंद्रातील कारभारात सुसुत्रता येऊन सुव्यवस्थाही निर्माण होण्यास मदत होणार आहे. परिणामी अंगणवाडी केंद्रातील बालकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुपोषण निर्मुलनासोबतच सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका मिळणार असल्याने कुपोषणमुक्तीचे कार्य प्रभावी होणार आहे. यामुळे आरोग्य विभागास मदत होणार आहे.