शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गैरआदिवासींमधील असंतोष वाढला

By admin | Updated: August 26, 2014 23:27 IST

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पदभरती पेसा कायद्यानुसार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गैरआदिवासी नागरिकांमधील असंतोष वाढला आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पदभरती पेसा कायद्यानुसार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गैरआदिवासी नागरिकांमधील असंतोष वाढला आहे. लोकप्रतिनिधी गैरआदिवासींच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात १३०० वर अधिक गावात पेसा कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे येथे वर्ग ३ आणि ४ चे सर्वच पद अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरले जाणार आहेत. गैरआदिवासींचा पेसा कायद्याला विरोध नाही. परंतु यातील नोकर भरतीच्या जाचक अटीला विरोध आहे. गैरआदिवासींची गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्याही अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येएवढीच आहे. त्यामुळे हा कायदा गैरआदिवासी समुदायावर नोकर भरतीत अन्याय करणारा आहे. आधीच राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी समाजाचे गडचिरोली जिल्ह्यातील आरक्षण हे १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. त्यातच आता पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.जिल्ह्यातील तीनही लोकप्रतिनिधी अनुसूचित जमातीचे असल्याने आजपर्यंत गैरआदिवासींच्या प्रश्नावर त्यांनी कधीही वाचा फोडण्याची भूमिका घेतली नाही. उलट आदिवासी समाजात धनगर समाजाला समाविष्ट करु नये, या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या अत्यल्प असतांनाही मोर्चा काढण्याचे काम प्रकर्षाने केले. त्याबरोबरच गैरआदिवासींच्या प्रश्नावर पत्र लिहिल्याचे नाटक काही लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र मुंबईत जाऊन कोणताही पाठपुरावा गैरआदिवासींच्या प्रश्नावर केला जात नाही, असा थेट आरोप विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही अनेकदा या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मुंबईत शिष्टमंडळामध्ये गेलेल्या नेत्यांना असा अनुभव आलेला आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणी थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आमरण उपोषण करून शासनावर दबाव आणावा, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार व बिगर आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये पेसा कायद्याचा विरोध करणारे ठराव पारीत करण्यात आले. मात्र राज्यपाल महोदयांचे नाव सांगून जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या कायद्याची अंमलबजावणी तत्परतेने करण्यासाठी मुख्यमंत्र्यावरही दबाव आणत असल्याची सूत्रांची माहिती आहे. गैरआदिवासींच्या मोर्चानंतर राज्यसरकारने पेसा अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट राज्य सरकार चांगला निर्णय म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असल्यामुळे सध्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे देणे-घेणे राहिलेले नाही, असा थेट आरोप आता होऊ लागला आहे. या प्रश्नावर कायम तोडगा न निघाल्यास गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत गैरआदिवासी मतदार बहिष्कार व नोटाचे हत्यार उपसल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे.