शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरूच

By admin | Updated: May 5, 2017 01:12 IST

संवर्ग विकास अधिकारी सपाटे यांचे स्थानांतरण करावे, या मुख्य मागणीसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी

मासिक सभेवर बहिष्कार : संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी धानोरा : संवर्ग विकास अधिकारी सपाटे यांचे स्थानांतरण करावे, या मुख्य मागणीसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. ३ मे रोजी बुधवारी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या मासिक सभेवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला. धानोरा येथील संवर्ग विकास अधिकारी सपाटे हे ग्रामसेवकांना अपमानजनक वागणूक देतात, असा ग्रामसेवकांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचे धानोरा येथून स्थानांतरण करावे, या मागणीसाठी १५ दिवसांपूर्वीपासून ग्रामसेवकांनी आंदोलन सुरू केले आहे. मध्यंतरी पंचायत समितीच्या आढावा सभा आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेवरही ग्रामसेवकांनी सुरुवातीला बहिष्कार टाकला होता. मात्र सपाटे यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आमदारांनी दिल्यानंतर ग्रामसेवक आढावा बैठकीला हजर होते. त्यानंतर मात्र सपाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आंदोलन सुरूच ठेवले आहे. ३ मे रोजी केलेल्या आंदोलनात ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष रमेश बोरकुटे, सचिव संजीव बोरकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, जयंत मेश्राम, नीलकंठ धानोरकर, सुनील संतोषवार, प्रकाश बंडावार, दिवाकर रामटेके, राजेश नागदेवे, भास्कर वडलकोंडा, पांडुरंग बुरांडे, उमेश धोडरे, प्रदीप बेलखेडे, जयश्री कुलसंगे, मडावी, किलनाके यांच्यासह ग्रामसेवक युनियनच्या इतर सदस्यांनी सहभाग नोंदविला होता. (तालुका प्रतिनिधी)