शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही विद्यमान राज्य सरकारने अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली ...

ठळक मुद्दे९ ला जि.प.समोर आंदोलन : मागण्यांवर शासनाकडून निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही विद्यमान राज्य सरकारने अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली नाही. शिवाय इतर सेवाविषयक प्रश्न कायम आहे. या प्रश्नावर आक्रमक होत गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी २२ जुलै सोमवारपासून सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे.केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसा आदेश राज्य शासनाने काढावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने मुंबईच्या मंत्रालयावर अनेकदा आंदोलने करण्यात आली. त्यावेळी सत्ताधारी पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आश्वासन देण्यात आले. मात्र कार्यवाही झाली नाही. शासनाच्या वतीने जीआरही काढण्यात आला नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात २२ जुलैपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने जोपर्यंत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जीआर काढला जात नाही, तोपर्यंत हे असहकार आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी माहिती आयटकचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांनी दिली आहे.९ आॅगस्ट रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील अंगणवाडी महिला कर्मचारी निदर्शने व आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सहभगी होण्याचे आवाहन चवळे यांनी केले आहे.मासिक अहवाल व आॅनलाईन माहितीला ब्रेकअंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गर्भवती माता व तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहार पुरविला जातो. शिवाय इतर योजनांचाही लाभ दिला जातो. मात्र सरकाचे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक बनले आहे. दरम्यान त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान बाल विकास प्रकल्प कार्यालय व प्रशासनाला मासिक अहवाल सादर न करणे, आॅनलाइन माहिती न भरणे तसेच शासनाला कोणतीही माहिती न देणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत. कर्मचाºयांच्या या असहकार आंदोलनामुळे शासन व प्रशासन अडचणीत सापडले आहे.