शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

ई-एज्युकेशनची सुविधा असलेली न. प. शाळा सन्मानित

By admin | Updated: February 7, 2015 23:23 IST

एकीकडे जिल्हा परिषद, नगर परिषद मराठी शाळांचा दर्जा ढासळत असताना गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात गडचिरोली न. प. च्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेने ई-एज्युकेशन

गडचिरोली : एकीकडे जिल्हा परिषद, नगर परिषद मराठी शाळांचा दर्जा ढासळत असताना गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात गडचिरोली न. प. च्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेने ई-एज्युकेशन सारखे अनेक उपक्रम राबवून आयएसओ प्रमाणपत्र मिळवून राज्याच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. शाळेच्या या यशाची माहिती मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.मुख्याध्यापक गोहणे म्हणाले की, गडचिरोली नगर पालिकेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेने मागील पाच-सात वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी विविध उपक्रम सुरू केलेत. ज्या शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे, त्या शाळांची पाहणी करून त्या शाळांमध्ये आपल्या शाळेपेक्षा वेगळे काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यानंतर आपल्याकडे कमी असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयएसओ नामांकनासाठी एक्सलंस मॅनेजमेंट सिस्टिमचे नितीन वैद्य यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले. आर्थिकबाबीसाठी नगर परिषदेने निधीची तरतूद करून सहकार्य केले. आयएसओ नामांकनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर ३१ मे २०१४ रोजी आयएसओ नामांकनासाठी नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर इंटर नॅशनल कॉन्सील एक्रेडेशन बॉडीच्या सदस्यांनी भेट दिली. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातही विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा व विद्यार्थ्यांचे ज्ञान बघून आश्चर्यचकीत झाले. समितीच्या सदस्यांनी अहवाल सादर केल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. आयएसओ नामांकनामुळे आपल्या शाळेची प्रतिष्ठा वाढली. त्यापेक्षाही इतर शाळांना यामधून निश्चितच प्रेरणा घेता येईल. आज नगर परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र शाळांनी दर्जा सांभाळल्यास खासगी शाळांप्रमाणेच याही शाळांमध्ये पालकवर्गाची प्रवेशासाठी रांग लागेल, असा विश्वास मुख्याध्यापक गोहणे यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेला नगर परिषदेचे शिक्षण सभापती सचिन बोबाटे, शाळेचे शिक्षक, शाळेचे मंत्रिमंडळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.