शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांपासून क व्हरेज गुल

By admin | Updated: August 7, 2014 23:58 IST

सिरोंचा तालुक्याच्या टोकावर व अतिदुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ९ महिन्यांपासून ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मागील ९ महिन्यांपासून दूरसंचार सेवा

झिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या टोकावर व अतिदुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ९ महिन्यांपासून ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मागील ९ महिन्यांपासून दूरसंचार सेवा ठप्प असल्याने परिसरातील ८ ते १० गावातील ग्राहक व नागरिकांना तालुका मुख्यालयात जाऊन आपली कामे करावी लागत आहेत. मात्र दूरसंचार विभागाचे दुर्गम भागातील सेवा सुरळीत करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. झिंगानूर परिसरात बीएसएनएल, डब्ल्यूएलएल सेवा उपलब्ध करण्यात आली होती. परिसरातील अनेक ग्राहकांनी ९३४ रूपये खर्च करून तरंग फोन विकत घेतले होते. त्यामुळे परिसरातील ४० च्यावर ग्राहकांनी तरंग फोन घरी बसविले होते. काही दिवस दूरसंचार विभागामार्फत सुरळीत सेवा पुरविण्यात आली. त्यानंतर मागील नोव्हेंबर २०१३ पासून बीएसएनएल, डब्ल्यूएलएल तरंग सेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांना इतरत्र संपर्क साधतांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी वारंवार दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क करून आपल्या म्हणणे मांडले. तरंग सेवा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारीही करण्यात आले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे झिंगानूर परिसरातील ग्राहकांना भ्रमणध्वनी, दूरध्वनी सेवेचा फायदा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ९ महिन्यांपासून झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ठप्प असतांनाही वरिष्ठ अधिकारी का लक्ष घालत नाही, असा परखड सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. झिंगानूर परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जातो. दूरसंचार सेवेचा परिसरातील नागरिकांना फायदा होत नसल्याने ९ महिन्यांपासून सेवा ठप्प पडली आहे. ग्राहकांचे पैशे परत द्यावे, अथवा तरंग सेवा सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्राहकांनी दिला आहे. (वार्ताहर)