शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

-तर पुढील वर्षी वाढणार ४५०० हेक्टर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:28 IST

राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे१८५२ विहिरी पूर्ण : चालू महिन्यात सुरू होणार २६४८ विहिरींचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे. येत्या उन्हाळ्यापर्यंत या विहिरी बांधून पूर्ण झाल्यास जिल्ह्यात पुढील वर्षी ४५०० हेक्टर अतिरिक्त सिंचनाची सोय होणार आहे.पूर्व विदर्भात सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ११ हजार ६१४ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ४५०० विहिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर झाल्या आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत १८१५ विहिरी बांधून झाल्या आहेत. प्रतिविहीर १ हेक्टर याप्रमाणे सिंचन सुविधा निर्माण होते. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी मंजूर ४५०० विहिरी पूर्ण झाल्यानंतर तेवढे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.जिल्ह्यात बहुतांश भूभागावर जंगल असल्याने केवळ दिना प्रकल्प वगळता कोणताही मोठा सिंचन प्रकल्प नाही. परिणामी सिंचनासाठी शेतात विहिरी किंवा बोअरवेल खोदणे हाच पर्याय आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भात सर्वाधिक सिंचन विहिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.एका विहिरीसाठी शासनाकडून २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. परंतू विहिरींचे बांधकाम स्वत: शेतकºयांनाच करायचे आहे. जसजसे बांधकाम होईल तसतसे त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम दिली जाते. मात्र जिल्ह्यात विहिरींचे खोदकाम तातडीने करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. मशिनरीसुद्धा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे विहिरींच्या कामास थोडा विलंब होत असला तरी हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून सुरू आहे. सिंचन विहिरींची मागणी जिल्ह्यात वाढली आहे.आणखी ३५०० विहिरींचा प्रस्ताव‘मागेल त्याला विहीर’ अशी घोषणा करीत हा सिंचन विहिरींचा कार्यक्रम जाहीर केल्याने जिल्हाभरातून ८२३२ अर्ज आले होते. त्यातून ६९४८ जण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४२०२ शेतकºयांच्या अर्जांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विहिरी खोदण्यासाठी इच्छुकांची संख्या बघता जिल्ह्यासाठी आणखी ३५०० विहिरी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याची माहिती लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.जी.रामटेके यांनी दिली.