शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

आलापल्ली क्षेत्रात नवे चेहरेच मैदानात

By admin | Updated: February 15, 2017 01:34 IST

आलापल्ली-वेलगूर हे जिल्हा परिषद क्षेत्र अहेरी तालुक्यात एकमेव साधारण प्रवर्गासाठी राखीव क्षेत्र आहे.

 काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळीच माघार : नऊ उमेदवार रिंगणात प्रशांत ठेपाले   आलापल्ली आलापल्ली-वेलगूर हे जिल्हा परिषद क्षेत्र अहेरी तालुक्यात एकमेव साधारण प्रवर्गासाठी राखीव क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक दिग्गज मैदानात उतरण्याच्या तयारीत होते. परंतु नामांकन पत्र परत घेतल्यानंतर आता बहुतांशी नवे चेहरेच मैदानात राहिले आहे. भाजपच्या वतीने बंडू भांडेकर व मोहन मदने हे दोघेही इच्छुक उमेदवार होते. अंतिम क्षणी मोहन मदने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर बंडू भांडेकर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. मोहन मदने हे भाजपच्या संघ शाखेशी जुळलेले असून या भागात भाजपसोबतच नाग विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनाही मदने यांना सांभाळावे लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बंडू भांडेकरांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवारच राहिलेला नाही. काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मुस्ताक हकीम यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना ती मिळाली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बबलू उर्फ अब्दूल जमीर हकीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु न्यायालयाने तिन अपत्याच्या कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द ठरविली. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. आता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशेष भटपल्लीवार हे उमेदवार आहेत व येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष तोडसाम हे ही अपक्ष म्हणून मैदानात उभे आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाकडून जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार हे मैदानात आहे. भाजप वगळता या मतदार संघात इतर पक्षाचे व अपक्षही उमेदवार तरूण व नवे चेहरे आहेत. त्यामुळे निवडणुकीतही या नव्या चेहऱ्यांनाच मतदारांना आता कौल द्यायचा आहे. येत्या चार ते पाच दिवसात प्रचार वाढणार आहे.